नांदेडमध्ये जबरी चोऱ्या वाढल्या, काय आहे कारण...? वाचा

file photo
file photo

नांदेड : मागील चार महिण्यापासून हातवर पोट असलेल्या रोजगारांच्या हाताच रोजगार गेला. अजूनही व्यवहार सुरळीत झाला नाही. तसेच हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमार येत आहे. याचा परिणाम थेट गुन्हेगारीवर पडला आहे. अनेक नवीन गुन्हेगार समोर येत असून जिल्हा व शहरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहराच्या टिळकनगर भागात राहणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजाराचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी जबरीने तोडून लंपास केले.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मार्चपासून लॉकडाउन लावले आहे. या लॉकडाउमध्ये अनेक नागरिकांच्या हातचा रोजगार गेला. काही दिवस त्यांनी पदरमोड करुन घरसंसार चालविला. परंतु लॉकडाउन काही उठविल्या जात नाही. तसेच हाताला काम मिळत नसल्याने अनेकजण गुन्हेगारीकडे वळत आहेत. पोलिसांनी पकडलेले चोरटे हे पहिल्यांदाच अशा गुन्ह्यात अडकल्याची कबुली देत आहेत. म्हणजेच लॉकडाउनमुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 

टिळकनगर भागातील घटना

टीळकनगर भागातील पुष्‍पाबाई जोशी (वय ७०) ह्या रस्त्याच्या कडेला असलेल्‍या झाडाचे फुले तोडून घराकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी चोरट्याने येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (गंठण) अडीच तोळे वजनाचे (७० हजार) रुपये जबरीने चोरून पळून गेले. शनिवारी (ता. ११) सकाळी सहाच्या सुमारास अचानक झालेल्या या घटनेमुळे पुष्पाबाई जोशी यांना मोठा धक्का बसला. नेमके काय झाले हे त्यांना समजले नाही. आरडाओरडा करेपर्यंत हे दोन्ही चोरटे तेथून पसार झाले.

विमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा

घडलेला प्रकार त्यांनी आपल्या घरी सांगितला. घरच्यांनी त्यांना धीर दिला व त्यानंतर पुष्‍पाबाई जोशी यांना सोबत घेऊन नातेवाइकांनी विमानतळ पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पुष्‍पाबाई प्रभाकर जोशी यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर करीत आहेत.

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाटमारी वाढली

दोन दिवसापूर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. एका व्यापाऱ्याला खंजर दाखवून तर दुसऱ्या घटनेच सासरी जाणाऱ्या का महिलेची पर्स जबरीने हिसकावून चोरुन नेली. मुदखेड येथील सौ. कहाळेकर यांच्या हातातील पर्स चालत्या दुचाकीवरून चोरट्यांनी लंपास केली होती. त्या पर्समध्ये जवळपास ६० हजार रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने होते. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com