Nanded News : माहूर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण; मुख्याध्यापकासह वॉर्डनचे तडकाफडकी निलंबन

मुख्याध्यापकासह वॉर्डनचे तडकाफडकी निलंबन: पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
rohit mukade death case at adivasi ashram school principal and warden suspension nanded
rohit mukade death case at adivasi ashram school principal and warden suspension nandedSakal

नांदेड : माहूर शहरातील शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेतील दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी रोहित मुकाडे याचा (ता.१०) ऑक्टोंबर मंगळवार रोजी रात्री आठ वाजता मृत्यू झाला होता, त्यामुळे ग्रामीण रुग्णालय येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काल (ता.११) रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास किनवटच्या तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी मृणाल जाधव व माहूरचे तहसीलदार किशोर यादव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद शिनगारे यांनी मृतकाच्या नातेवाईकांशी चर्चा करून मृतदेहावर इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी नांदेडला पाठवले होते,

सायंकाळी सहाच्या दरम्यान शवविच्छेदनानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दोषीविरुद्ध अद्याप पर्यंत कारवाई झाली नसल्यामुळे त्वरित कारवाई करा,अन्यथा प्रेत शाळेत आणून ठेवूत अशी भूमिका घेतली होती.मात्र गुन्हा दाखल न झाल्याने शेवटी रात्री नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान मृतदेह माहूरच्या शासकीय आश्रम शाळेत आणण्यात आले.

त्यानंतर मात्र आंदोलन चिघडल्याने मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास दोषी मुख्याध्यापक आणि वार्डन विरुद्ध गुन्हा दाखल करून एफआयआर ची प्रत दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन विद्यार्थ्याच्या मुळगावी रवाना झाले.

आदिवासी विकास विभाग द्वारा संचालित शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी तीस तासानंतर प्रेत ताब्यात घेण्यात आले.पोलिसांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रचंड दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचे आंदोलक नातेवाईकाचे म्हणणे आहे.

रात्री ९:३० वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांचे प्रेत शाळेच्या दारावर आणून ठेवण्यात आले.मध्यरात्री दीड वाजेपर्यंत आदिवासी आश्रम शाळा परिसरात अंधाराच्या काळोख्यात दोषी विरोधात तब्बल चार तास आंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद शिंगारे,पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी संयमाची भूमिका घेत तहसीलदार किशोर यादव,

नगरपंचायत चे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांच्या मध्यस्थीने आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय किनवटचे अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलूवून घेण्यात आले,यशस्वी शिष्टाई नंतर रात्री उशिरा माहूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक बी.एम सोनटक्के व अधीक्षक बी.बी.वाकोडे यांच्या वर निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद करण्यात आल्याने अखेर प्रकरण निवडले.

◼️मुख्याध्यापकासह वार्डनचे तडकाफडकी निलंबन

कर्तव्यात कसूर करत विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे निघा न रखल्यामुळे शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळा माहूर येथे २ वर्गात शिकणाऱ्या रोहित प्रवीण मुकाडे या विद्यार्थ्यांचा संशयितरित्या मृत्यू झाल्याचे कारण ठेवत किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर लक्ष न ठेवणे,त्यांची काळजी न घेणे,जवाबदारी नीटपने पार पडली नसल्याचे कारण ठेवत प्रभारी मुख्याध्यापक बी.एम सोनटक्के व अधीक्षक बी.बी.वाकोडे यांच्या वर निलंबनाची कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com