नांदेड - महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांपेकी मूळ शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे, तसेच रेणुकामातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या माहूरगडाचा आता कायापालट होणार आहे. सर्व वयोगटातील भाविकांना भक्तीसोबत त्यांच्या आवडीनुसार पर्यटनाची जोड देता येणार आहे.
माहूरगड देवस्थान विकास आराखड्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.