लसीकरणात ग्रामीण भाग अग्रेसर; शहरातील तरुणाईमध्ये उदासिनता

या उलट ४५ व त्या पुढील वयोगटीतील ग्रामीण भागातील दोन लाख २९ हजार ४४९ नागरीकांनी तर महापालिका क्षेत्रातील ४२ हजार ६२२ असे दोन लाख ७२ हजार ७१ नागरीकांनी पाच मे पर्यंत लस घेतली आहे.
लसीकरण
लसीकरण

नांदेड ः केंद्र सरकारने एक मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक (Corona vaccination) लस घेणे बंधनकारक केले आहे. यास आठवडा होत आहे. असे असताना देखील १६ तालुके व आठ नगरपालिका केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील केवळ पाच हजार ९४९ नागरीकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. शहरी भागातील (city area) तरुणाईने मात्र लस घेण्यास फारशी उत्सुकता दाखवल्याचे दिसत नाही. Rural areas leading in vaccination; Depression in youth in the city

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाणे करण्यासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यासह शहरीभागात आठ अशा ६८ केंद्रावर लसीकरण केले जात आहे. महापालिका क्षेत्रातील आठ केंद्रावर व ग्रामीण भागातील नायगाव - पाच केंद्र उमरी- चार व नगरपालिकेचे आठ अशी एकूण २५ केंद्र वगळता अर्धापूर, भोकर, बिलोली, धर्माबाद, भोकर, देगलूर, हदगाव, किनवट, माहूर, लोहा, कंधार, मुखेड, मुदखेड, हिमायतनगर या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील एकाही नागरीकांनी लस घेतली नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

हेही वाचा - निवृत्त IAS अधिकाऱ्याने केला अक्षयवर आरोप

या उलट ४५ व त्या पुढील वयोगटीतील ग्रामीण भागातील दोन लाख २९ हजार ४४९ नागरीकांनी तर महापालिका क्षेत्रातील ४२ हजार ६२२ असे दोन लाख ७२ हजार ७१ नागरीकांनी पाच मे पर्यंत लस घेतली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी लसीकरण सुरु आहेत. परंतु ज्या नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत येण्यासाठी कुणी मदत करत नाही. अशा ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी जाऊन त्यांचे लसीकरण करण्यावर भर देत आहेत. आतापर्यंत तीन लाख ४४ हजार ८०० नागरीकांचे लसीकरण झाले आहे. सध्या को- व्हॅक्सीनचे १६ हजार व कोविसिल्डचे दहा हजार ७०० असे २६ हजार ७०० लसीचे डोस उपलब्द आहेत.

- डॉ. बालाजी शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड)

या केंद्रावर घेतले डोस

नायगाव - पाच केंद्रावर- एक हजार १७८

उमरी- चार केंद्रावर - एक हजार २३३

नगरपालिका - आठ केंद्र- एक हजार १६१

महापालिका क्षेत्रात- आठ केंद्र - दोन हजार ३७७

एकूण- पाच हजार ९४९

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com