esakal | सचखंड गुरुद्वारा : तख्तस्नान सोहळा, एक ऐतिहासिक धार्मिक प्रथा !
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शीख धर्मियांच्या पाच तख्तांपैकी ( धर्मपीठ) एक पवित्र पावन "तख्त' नांदेड येथे तख्त सचखंड श्री हजूर साहेब नावाने विराजमान आहे. वरील ठिकाणी शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचा सन 1708 काळी अनेक दिवस वास्तव्य होता. आपल्या परलोकगमन करण्यापूर्वी त्यांनी श्री गुरु ग्रंथसाहेबांना अटल गुरु म्हणून श्री आदी गुरु ग्रंथसाहेबांना गुरुगद्दी (गुरुपद) प्रदान केली. पुढे या स्थानाला "तख्त" म्हणून धार्मिक मान्यता मिळाली.

सचखंड गुरुद्वारा : तख्तस्नान सोहळा, एक ऐतिहासिक धार्मिक प्रथा !

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील दोन दशकापासून नांदेडचा तखतस्नान हा धार्मिक सोहळा भाविकांच्या आकर्षणाचा विषय झालेला आहे. दीपमाला आणि दिवाळी सणाच्या तुलनेत तखतस्नान विषयी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. तख्त सचखंड येथे साजरा होणाऱ्या विविध सण आणि सोहळ्यात तख्तस्नान हा सर्वात आवडीचा सण. हा सण नांदेडमध्येच साजरा होतों हे सर्वात मोठे धार्मिक वैशिष्ट्य म्हंटले पाहिजे. 

शीख धर्मियांच्या पाच तख्तांपैकी ( धर्मपीठ) एक पवित्र पावन "तख्त' नांदेड येथे तख्त सचखंड श्री हजूर साहेब नावाने विराजमान आहे. वरील ठिकाणी शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचा सन 1708 काळी अनेक दिवस वास्तव्य होता. आपल्या परलोकगमन करण्यापूर्वी त्यांनी श्री गुरु ग्रंथसाहेबांना अटल गुरु म्हणून श्री आदी गुरु ग्रंथसाहेबांना गुरुगद्दी (गुरुपद) प्रदान केली. पुढे या स्थानाला "तख्त" म्हणून धार्मिक मान्यता मिळाली. देशात श्री अमृतसर (पंजाब) येथे सर्वोच्च तख्त म्हणून "श्री अकाल तख्त साहिब" विद्यमान आहे आणि प्रथम तख्त स्थापण्याची परंपरा येथूनच सुरु झाली. श्री हरगोबिंद साहेब, 6 वें गुरु यांनी प्रथमच श्री अकाल तख्तसाहबची स्थापना केली. तदन्तर तख्त हरिमंदर साहेब पटना (पाटना, बिहार), तखत केशगढ़ साहेब, आनंदपुर साहेब पंजाब, तख्त सचखंड श्री हजूर साहेब नांदेड आणि तख्त श्री दमदमा साहेब अशा पाच तख्तांची रचना पुढे आली. या पांच तख़्तांपैकी नांदेड येथील सचखंड श्री हजूर साहेब येथेच "तख्तस्नान" नावाची परंपरा पाळण्यात येते. 

हेही  वाचा -  देगलूरातील चारशे एकरमध्ये बहरतोय पेरु, सीताफळ -

विदेशातील भाविकांची देखील वरील सोहळ्याविषयी उत्कंठा पाहण्यात येते

दिवाळी पूर्वी ज्या पद्धतीने घरांची स्वच्छता करण्यात येते. त्या पद्धतीने या धार्मिक स्थानाची स्वच्छता भाविकगण करतात. गोदावरी नदीतून घागर किंवा भांड्यातून पाणी आणून श्री अंगीठा साहेब, सर्व ऐतिहासिक शस्त्रं आणि गुरुद्वाराची पूर्ण ईमारत धुवून स्वच्छ केली जाते. सर्व भाविकांना या सेवेत हातभार घालण्याची संधी लाभते. स्वछतेचा हा सामुदायिक आणि धार्मिक उपक्रम आहे. नांदेड येथे पार पडणाऱ्या तख्त स्नान सोहळ्यास मागील वीस वर्षात चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे. विदेशातील भाविकांची देखील वरील सोहळ्याविषयी उत्कंठा पाहण्यात येते. वर्ष 2004 च्या तखतस्नान कार्याच्या वेळी  मला तख्तस्नान परंपरेचे अधिक महत्त्व अवगत झाले. त्या काळी शीख समाजाने गोदावरी नदीच्या स्वछता कार्यासाठी सामूहिक पुढाकार घेतला होता. या वर्षी तख्तस्नान कार्यक्रमावेळी सर्व पत्रकार प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सर्वधर्मीय मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमास चांगली प्रसिद्धि मिळाली. 

गोदावरीचे पवित्र जल घागरीमध्ये भरुन अरदास करुन त्या जलापासून श्री अंगीठा साहेबांना स्नान 

पुढे श्री गुरु वर्ष 2008 मध्ये ग्रंथसाहिब गुरुतागद्दी त्रिशताब्दी कार्यक्रमावेळी तख्तस्नान सोहळा कार्यक्रमास चांगली प्रसिद्धी लाभावी यासाठी पत्रकारितेच्या माध्यमाने आणि शीख धर्मीय नांदेडकरी या जाणिवेतून तख्तस्नान कार्यक्रमाची प्रसिद्धी मी हातात घेतली. पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींनी देखील आपल्या नांदेडचा हा परंपरागत सोहळा म्हणून मोठ्या आपुलकीने तख्तस्नान सोहळ्याची प्रसिद्धी केली. त्यामुळे देशभर आणि विदेशात देखील तख्तस्नान सोहळा विषयी आकर्षण वाढले. आजच्या तिथिला देखील तख्तस्नान सोहळ्याविषयी सर्वधर्मीय उत्कंठा व्याप्त आहे. अगदी लहान बाळापासून वृद्ध देखील तख्त स्नान सोहळ्यात सहभागी होतात. तख्त सचखंड श्री हाजूर साहेब येथून घागरिया सिंघ अरदास उपरांत चांदीची घागर घेऊन भाविक मंडळी सह गोदावरी नदी नागिनाघाट येथे पोहचतात. येथून गोदावरीचे पवित्र जल घागरमध्ये भरुन अरदास करुन त्या जलापासून श्री अंगीठा साहेबांना स्नान घालण्यात येतो. सोबत भाविक सुद्धा भांड्यात पाणी भरून गुरुद्वारा आणून त्या पाण्याने स्वच्छता सेवा करतात. 

येथे क्लिक करा नांदेड- ​बायपास सर्जरी विभाग सुरु करण्यासाठी अधिष्ठाता प्रयत्नशील, मोडुलर प्लॉन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता

 दिवसभर चलणारा हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा

या पद्धतीने गोदावरी नदीतून तीन वेळा फेर्या (चक्कर) घालून पाणी घेण्याची परंपरा आहे. सर्व समाज घटक या सेवाकार्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. दिवसभर ऐतिहासिक शस्त्रांची साफसफाई केली जाते. प्रशिक्षित सिखलीगर समाज शस्त्रांच्या स्वछता कार्यात आणि शस्त्रांना धार लावण्यात योगदान देतो. जत्थेदार साहेब आणि पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनात समाजातील धार्मिक वृत्तीचे सर्व भाविक, युवा वर्ग वेगवेगळ्या धार्मिक परम्परांच्या संचालनात मोठी मदत करतात. दिवसभर चलणारा हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. हजुरसाहिब नांदेड शहराचाच हा आगळा वेगळा सोहळा म्हणून सर्वत्र ओळखला जात आहे. महाराष्ट्र शासनाने देखील या विशिष्ट परंपरेची दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. 

वीस हजार भाविकांची उपस्थिती ! 

दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी एक दिवस अगोदर तख्तस्नान साजरा करण्याची प्रथा आहे. या सोहळ्यात वीस हाजरापेक्षा जास्त भाविक सहभागी होतात. यात देशातून आणि विदेशातूनही भाविक हजर असतात. हातात भांडी घेऊन भाविक पाणी भरण्याची सेवा करतात. 

ऐतिहासिक शस्त्रांची सफाई ! 

भाविकांना वर्षातून एकच दिवस गुरुद्वारातील सर्व ऐतिहासिक शास्त्रांना जवळून दर्शन घेण्याची मुभा लाभते. या वेळी भाविक शस्त्रं सफाईच्या सेवेत सुद्धा पाचारित होतात. गुरुद्वात श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या काळातील सर्व ऐतिहासिक शस्त्रांची जपावणूक करण्यात आली आहे. 
शब्दांकन- रविंदरसिंघ मोदी, पत्रकार, नांदेड