esakal | सहस्त्रकुंड आत्महत्या प्रकरण : मृत महिलेच्या भावाची पोलिसांत तक्रार, दोन्ही मुली बेपत्ताच 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

माझ्या भाऊजींकडून दुकानाची चावी घेऊन त्यांना मारहाण केली. मुला- बाळांसह सर्वांनाच घराच्या बाहेर हाकलून दिले. अशी तक्रार अतुल प्रकाश मुक्तावार रा. परभणी यांनी इस्लापूर पोलिस ठाण्यात दिली

सहस्त्रकुंड आत्महत्या प्रकरण : मृत महिलेच्या भावाची पोलिसांत तक्रार, दोन्ही मुली बेपत्ताच 

sakal_logo
By
गजानन पाटील

हदगाव (जिल्हा नांदेड) : माझ्या बहीणीस व मेहुण्यास सासू- सासरे भगवान वल्लभशेटवार (कवानकर), दीर प्रशांत व जाऊ भाग्यश्री यांच्याकडून वेळोवेळी मानसिक त्रास व मारहाण करण्यात आली. वाटणी पत्रकाबद्दल गेली वर्षभरापासुन नाहक त्रास देत होते आणि अखेर हदगावचे राहते घर व दुकान सासऱ्यांनी प्रशांतच्या नावाने मृत्यूपत्र वाटणीत करत माझ्या भाऊजींकडून दुकानाची चावी घेऊन त्यांना मारहाण केली. मुला- बाळांसह सर्वांनाच घराच्या बाहेर हाकलून दिले. अशी तक्रार अतुल प्रकाश मुक्तावार रा. परभणी यांनी इस्लापूर पोलिस ठाण्यात दिली आणि संबंधितांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली. 


हदगाव येथील प्रशांत ट्रेडींग कंपनी किराणा दुकानदार व्यापारी प्रविण भगवान वल्लभशेटवार यांचे मुख्य रस्त्यावर मोठे दुकान असून गेली कित्येक वर्षांपासून ते येथे व्यापार करतात. परंतु काही दिवसांपासून भगवान वल्लभशेटवार, प्रशांत व प्रविण या तीन बाप लेकांचा हदगाव येथील दुकान व घर या मालमत्तेसाठी वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर बोलाचाली व वेळप्रसंगी हाणामारीत झाले. हदगावच्या प्रॉपर्टीत तुला हिस्सा नाही, तू घर आणि दुकान सोडून तत्काळ जा अन्यथा तुला व तुझ्या परिवाराला जिवंत ठेवणार नाही आणि तुमच्या सर्वांच्या मृत्यूचा पत्ताही कोणाला लागू देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या बहिणीचे सासु, सासरे, दीर व जाऊ यांच्याकडून माझी बहीण व भाऊजीस वारंवार देण्यात येत होत्या.

हेही वाचा -  अर्धापुरात हाथरस घटनेच्या निषेधार्थ काॅंग्रेसचा मोर्चा -

घटनेस जबाबदार असणाऱ्या मंडळीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी

मी बहीण व भाऊजींच्या मोबाईलवर फोन करून पाहिला तर फोन स्वीच ऑफ येत होता. एकेदिवशी फोन लागला तर तो फोन पोलिसांनी उचलला आणि म्हणाले की, तुमच्या भाऊजींचा मृतदेह नदीत मिळाला. तिघा जणांचा मृतदेह सापडला अजून दोघांचा काहीही पत्ता लागलेला नाही. तरी पोलिस निरीक्षक यांनी या घटनेस जबाबदार असणाऱ्या मंडळीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रकारची तक्रार मयत प्रविणचा मेहूणा अतुल मुक्तावार (रा. परभणी) यांनी पोलिसात दिली आहे. 

येथे क्लिक करावाहनधारकांनो सावधान : पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सुचनेवरुन वाहतूक शाखा जोमात
  

'आत्महत्या की खुनच' पोलीसांना छडा लावावाच लागणार

प्रविण व त्यांची पत्नी तसेच दोन मुली व एक मुलगा अक्खे कुटुंब पाण्यात बुडुन मृत्यू पावले त्यापैकी तिघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले तर उर्वरीत दोन मुलींचा शोध घेणे सुरू आहे असे असले तरी मयत प्रविणचे मेहुणे अतुल मुक्तावार यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीत  माझ्या बहिणीच्या सासु,सासरे भगवानराव,दीर प्रशांत व त्याची पत्नी भाग्यश्री यांचेकडून माझ्या बहीण व भाऊजीस मारहाण करीत मानसिक त्रास देणे, घराबाहेर हाकलुन देणे,जीवे मारण्याची धमकी देत घर व दुकान सोडुन निघुन न गेल्यास तुमच्या मृतदेहाचा पत्ताही लागु देणार नाही अशा धमक्यांचा वारंवार उच्चार झाल्याने खरोखरच प्रविण व त्यांच्या दाम्पत्याची आत्महत्या की कट रचुन केलेला हा खुनच आहे की काय याचा शोध घेत त्याचा छडा नुतन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना घ्यावा लागणार आहे,त्यांच्यासमोर हे एक मोठे आव्हानच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही हे मात्र खरे.

संपादन - प्रल्हाद कांबळे