Bill-Book-square.jpg
Bill-Book-square.jpg

कच्चे बिल देऊन विक्रीकराची चोरी

Published on


धर्माबाद, (जि. नांदेड) : धर्माबाद शहरात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाहीत. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत असून ग्राहकांचीही फसवणूक होत आहे. शहरातील रुद्रावार ड्रेसेस कापड दुकानदाराने ग्राहकास पक्के बिल न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

धर्माबाद शहरात विविध दुकाने आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री केली जाते. कुठलीही वस्तू विकल्यानंतर त्याची पक्की पावती देण्यात यावी, असे आदेश आहेत. मात्र लाखो रुपयांचा व्यवहार असला तरी कोऱ्या कागदावरच लिहून दिले जाते. व्यावसायिकांनी वापरलेल्या या फंड्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. शहरातील देवीगल्लीत मस्जिदच्या बाजूला रुद्रावार ड्रेसेस कापड दुकान आहे. 


पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल 
मंगळवारी (ता.२२) रोजी या दुकानात एका सुदर्शन नावाच्या ग्राहकाने कपडे खरेदी केले होते. पण त्यास पक्के बिल दिले नाही. कपडे लहान मोठे झाल्याने वापस करण्यासाठी गेले असता वापस न घेता दुसरे कपडे खरेदी करायला लावले. त्यामुळे ग्राहकाला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसला. दुसऱ्यांदा पक्के बिल मागूनही बिल न देता ग्राहकांची दुसऱ्यांदा फसवणूक केली. याबाबत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी कापड दुकानदारास विचारणा केली असता त्यांना आरेरावीची भाषा वापरत पक्के बिल देणार नाही, काय करायचे ते कर म्हणून उद्धट बोलले. तरी सदरील दुकानदाराविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी धर्माबाद पोलिस ठाण्यात रीतसर दाखल केली आहे. 

कर वाचविण्यासाठी कच्चे बिल देऊन केली जाते बोळवण 
शहरातील बांधकाम साहित्य विक्रेते, कापड दुकानदार, लाकूड व्यावसायिक, औषधी, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स सेंटर, कृषी सेवा केंद्र आदी व्यावसायिकांनी ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूची पक्की पावती देणे बंधनकारक आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र ग्राहकाला छापील पावती दिली जात नाही. हा प्रकार केवळ कर चुकविण्यासाठी असून ग्राहकाला कच्चे बिल देऊन बोळवण केली जाते. पक्की पावती दिल्यास त्याचा हिशोब शासनाला सादर करावा लागतो. वर्षभराच्या उलाढालीवर व्यावसायिकाला कराची रक्कम भरावी लागते. ही रक्कम वाचविण्यासाठी पावती दिली जात नाही. मात्र त्याचा फटका ग्राहकाला बसण्याची शक्यता असते. मात्र नियमानुसार बिल देणे गरजेचे असताना तालुक्यात बहुतांश दुकानदार कर वाचविण्यासाठी बिलच देत नसल्याचे दिसते. परंतु कारवाई कोणावरही झाल्याचे दिसत नाही.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com