
नांदेड : समाजात समतेची भावना रुजवणाऱ्या साहित्याचा जागर करण्यासाठी समरसता साहित्य परिषदेच्या वतीने विसावे समरसता साहित्य संमेलन नांदेडमध्ये होत आहे. दोन आणि तीन ऑगस्टला होणाऱ्या या संमेलनासाठी गुरुगोविंदसिंघजी साहित्यनगरी सज्ज झाली आहे. यामध्ये राज्यातील साहित्यिक, कवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.