esakal | आज ‘संगीत शंकर दरबार' फेसबुक पेज व युट्युब चॅनलवरुन मिळणार पूर्वसंध्येच्या निवडक स्मृतींना उजाळा !

बोलून बातमी शोधा

The Sangeet Shankar Darbar Festival will be held in Nanded today through Facebook page and YouTube channel.jpg}

याची सुरुवात गुरुवार( दिनांक २५ )फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता 'पूर्वसंध्ये'चा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

nanded
आज ‘संगीत शंकर दरबार' फेसबुक पेज व युट्युब चॅनलवरुन मिळणार पूर्वसंध्येच्या निवडक स्मृतींना उजाळा !
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव कोव्हिड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आला आहे. परंतु रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून 'संगीत शंकर दरबार' या फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवरुन मागील सोळा वर्षांतील निवडक स्मृतींना सलग तीन दिवस उजाळा दिला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याची सुरुवात गुरुवार( दिनांक २५ )फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता 'पूर्वसंध्ये'चा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, उषा मंगेशकर आणि 'सारेगम लिटल चँप्स' मधील राहुल सक्सेना, उर्मिला धनगर, कार्तिकी गायकवाड व छोटे सुरवीर इत्यादी मान्यवरांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. 

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा अमिताताई  चव्हाण, सचिव श्री डी.पी. सावंत, सहसचिव उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर तथा संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि संयोजन समितीतील संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, अपर्णा नेरलकर, ऋषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख, विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.