कोरोना योद्ध्यांना बहिणीकडून राखीसोबत सॅनिटायझर

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : अनेक शासकीय आरोग्य कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी हे खरे कोरोना योद्धे आजही रस्त्यावर उभे राहुन जनतेची सेवा करत आहेत. अशा या संकट समयी समाजाचे संरक्षक म्हणून ज्या कोरोना योद्ध्यांनी कार्य केले त्या पोलीस कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांना रक्षाबंधनाच्या दिवशी ‘नॅशनल इंटिग्रेटेड फॉर्म ऑफ आर्टिस्ट अँड ॲक्टिव्हीस्ट’ शाखा नांदेडच्या महिला विंग व सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे कोरोना योद्धांना राखी बांधून त्यांच्या रक्षणासाठी त्यांना मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. 

महिला विंग व सप्तरंग सेवाभावी संस्थाच्या वतीने सोमवारी (ता. तीन) नांदेड शहरातील वजीराबाद, इतवारा, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ पोलीस ठाणे व त्यासोबत कर्तव्यावर असलेले सर्व पोलिस कर्मचारी आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी या सर्वांना राखी बांधून त्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन रक्षा कवच देखील भेट म्हणून दिले. सोशल डिस्टंसिंग पाळत हा उपक्रम साजरा करण्यात आला. 

यांनी घेतला उपक्रमाच सहभाग 

यावेळी निफाचे जिल्हाध्यक्ष भास्कर डोईबळे, विक्रांत हटकर, शुभम भारतीय, कृष्णा या सर्वांनी सहकार्य केले तर महिला विंगचे भाग्यश्री खांदरे, रागेश्री जोशी, साक्षी मणियार, अष्टगाथा काळवे, देवयानी जोशी या सर्वांनी या उपक्रमात भाग घेतला.

कोरोना योद्धाप्रती आदर भाव ​
कोरोना आजाराने अनेकांचे  बळी घेतले, शेकडो लोकाच्या नौकऱ्या गेल्या, हातची कामे गेल्याने तळहातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना योद्धे म्हणून जनतेच्या आरोग्यसाठी तीन महिण्यापासून कुटुंबाची परवाह न करता रस्त्यावर असलेल्या कोरोना योद्धाप्रती आदर भाव व्यक्त करण्यासाठी व त्यांना रक्षाबंधणाच्या दिवशी राखी बाधुन हा रक्षाबंधणाचा उत्सव साजरा करणे हे प्रत्येक बहिणीचे स्वप्न असते ते स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
 डॉ. भरत जेठवाणी अध्यक्ष निफाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व सप्तरंग सेवाभावी संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com