esakal | सराफा सुवर्णकार संघाने थेट अर्थमंत्र्यांनाच घातले साकडे...
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

अनेक संघटना, संस्था ह्या स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याच्या उद्देशाने शासनाकडे मदतीची याचना करतात. परंतु नांदेड जिल्हा सराफा सुवर्णकार संघाने शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली असली तरी, ती स्वतःसाठी नव्हे मग या संघटनेनी नेमकी काय आणि कुणासाठी मागणी केली, याबद्दल ही बातमी वाचावी लागेल. 

सराफा सुवर्णकार संघाने थेट अर्थमंत्र्यांनाच घातले साकडे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात सोन्या- चांदीची दीड हजाराच्या आसपास दुकाने आहेत. त्यांच्याकडे सुवर्ण कारागीर म्हणून काम करणाऱ्या मजुरांची संख्या तीन हजाराच्या घरात आहे. इतक्या संख्येनी असलेल्या या कारागिरांची कुठेही संघटना नाही किंवा नोंद नाही. त्यामुळे तळहातावर पोट असलेल्या या कारागीरांवर दोन महिन्यापासून काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहिर केले. या पॅकेजच्या माध्यमातून अनेक लहान मोठ्या उद्योगास बळकटी मिळणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, मजूर, फेरीवाले, बांधकाम मजूर यांच्यासह अनेक लहान मोठ्या उद्योगांचा ही समावेश केला आहे. ही सर्वांसाठी चांगली गोष्ट असली तरी, कधीच समोर न आलेला सुवर्ण कारागीर मजूर केंद्राच्या या पॅकेजपासून दुर्लक्षित राहिला आहे.

हेही वाचा- अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला का गेले...

परप्रांतीय कारागीर गावी निघून जाण्याच्या मार्गावर 

दोन महिन्यापासून त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने असंघटीत असलेल्या या सुवर्णकारागिरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्हा सराफा सुवर्ण संघाने थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेच मदतीसाठी याचना केली आहे. सोन्याचे दागिने घडविणाऱ्या असंघटीत कामगारांना काम नसल्याने अनेक परप्रांतीय कारागीर गावी निघून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे सोने - चांदी व्यापाऱ्यांनी त्यांना थांबवून ठेवले असले तरी, या पुढे त्यांना थांबवणे शक्य नाही. तेव्हा कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या कारागीर मजुरांना शासनाकडून अर्थिक मदत व्हावी, अशी मागणी केली जात आहे. 

हेही वाचा- रेशन दुकानदारांना कोरोना, धान्य घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांची पळापळ

मजूरावर उपासमारीची वेळ येण्यापूर्वीच केंद्राने मदत द्यावी.

कोरोना - २०१९ मधून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सफल भारत अर्थसहाय्य मदत म्हणून २० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु या पॅकेजमध्ये सुवर्णकारागीर यांना कुठलीही मदत देण्यात आली नाही. त्यामुळे एका अर्थाने असंघटीत असलेल्या या कारागीरांवर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तळहातावर पोट असलेल्या या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येण्यापूर्वीच केंद्र शासनाने त्यांना २० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून त्यांना मदत द्यावी.
- सुधाकर टाक धानोरकर, अध्यक्ष, नांदेड जिल्हा सराफ सुवर्णकार संघ.