सहावारीच्या घोळक्यात नऊवारी साडी लोप पावली

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 6 April 2021

. त्या- त्या समाजाला करावी लागणारी काम त्याचं सामाजिक उतरंड मधील स्थान त्यांचे दर्शन या सर्व बाबींचे दर्शन स्त्रियांच्या साडीवरुन आणि नेसल्यावरुन होत असे.

नांदेड : नववार साडी ही पूर्वीपासून महाराष्ट्रात लोकप्रियतेची वेशभूषा आहे. महाराष्ट्रीयन महिलामध्ये नऊवार साडी अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील कसोट्या घालून नऊवारी नेसण्याची रीती पुरातत्व नोंदीनुसार सर्वात प्राचीन ठरु शकते. साडीचा पोत, रंग, प्रकार हे त्या स्त्रीचा सामाजिक स्तर व विशेषता अशा बाबी दर्शवायचा. नेसण्याच्या पद्धती समाजानुसार वेगवेगळ्या असायच्या. त्या- त्या समाजाला करावी लागणारी काम त्याचं सामाजिक उतरंड मधील स्थान त्यांचे दर्शन या सर्व बाबींचे दर्शन स्त्रियांच्या साडीवरुन आणि नेसल्यावरुन होत असे.

म्हणजे पुरुषांच्या पगडीप्रमाणे होतं. पगडीवरुन बाप्याची तर लुगड्यावरुन बाईची जात समजते असे म्हणतात. ते यामुळेच साडी नेसण्याच्या पद्धतीवर आधीच्या काळापासून धार्मिक संकल्पनांचा बराच प्रभाव दिसून येतो. यात आता सुटसुटीतपणा येऊ लागला आहे. साडीचे मुख्य वैशिष्ट्य आहे तिच्या रचनेतील प्रवाहीपणा असलं तरी पारंपारिक साडीची रचना ही तशी बांधणी असते. साडी ठरावीक भागात विभागली जाऊ शकते. साडीच्या वरच्या व खालच्या बाजूला आडव्या रेषेत असणारे समांतर काठ किंवा किनार एका टोकाला असणाऱ्या पदर आणि साडीचे अंग या तीन भागात साडी विभागलेली असते.

हेही वाचा दुधना आटताच परभणीचे गोकुळ आटले

संपूर्ण भारतात बनणाऱ्या साड्यांमध्ये हीच रचना पहावयास मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्सल भारतीयत्व दाखविणाऱ्या काही गोष्टींमध्ये साडीही महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील कसोट्या घालून नऊवारी नेसण्याची रीत ही पुरातत्त्वनुसार प्राचीन ठरु शकते. कारण प्राचीन काळातील टेराकोटा शिल्पा उपलब्ध आहे. यात साधारण आता अशाच पद्धतीने कसोट्या घालून नेसलेली साडी पाहायला मिळते. पण मराठी नऊवारी नेसणे हे विशेष लोकप्रिय ठरले. ते नेसणे स्त्री शरीराच्या आकाराची जास्त साधर्म्य असणारा असल्यामुळे कदाचित जास्त भाव गेले असेल. याचमुळे नऊवारी नेसलेली स्त्री अधिकच सुबक दिसते.

अनेक शिल्पकारांनी नऊवारीतील कलात्मकता नाजूकपणा व दिखावा याचा अद्भुत आविष्कार त्यांच्या अनेक शिल्पातून नमूद केला आहे. महाराष्ट्रात ढोबळपणे नऊवारी काष्टा नेसण्याची दोन पद्धती होत्या. ब्राह्मणी आणि कायस्थ ब्राह्मणी साडी नऊवारी असायची. सरस्वती रीतीने नेसण्यासाठी दहावार किंवा अकरावार साडी लागायची अशा साड्या पायघोळ व डोलदार दिसायच्या. खांद्यावरचा पदर हे कधी खाली जायचा नाही. नऊवारीचे कासोटा होते आणि सोगे हे दोन प्रकार आहेत. समाजात हळूहळू लोकशाही रुजली होती. त्याचप्रमाणे ती साडी नेसण्यामध्ये अवतरली जाती- धर्म सामाजिक व आर्थिक स्तर राजपरिवार व सामान्य जर असा कोणताही भेदभाव नसलेले साडी नेसणे भारतीय समाजात चांगले समजल्या जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sari disappeared on the ninth miter in the six miter mix nanded news