
सरकीच्या भाववाढीचा खाद्यतेलाला तडका
नांदेड: गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या खाद्यतेलाचे दर पुन्हा वधारल्याने महागाईचा चटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय पाम व सोयाबीन यांची आयात कमी केल्याने तेलात भाववाढ होत असल्याने सोयाबीन तेल पुन्हा १४२ तर पामतेल १३५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.
हेही वाचा: पहिली ते नववीच्या परीक्षाच्या तारखा जाहीर, शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती
यंदा कापसाला चांगला भाव मिळत आहे. शिवाय सरकीचेही (काॅटन सीड) भाव वाढले.तीन हजार ८०० रुपयांपर्यंत सरकीचे भाव पोहोचले व त्यामुळे सरकीच्या तेलाचेही भाव वधारले. त्याचा थेट परिणाम इतर तेलांवर होत आहे. खाद्यासाठी सरकीच्या तेलाचा फारसा वापर होत नसला तरी तेलातील कोणत्याही प्रकारातील भाववाढ झाल्यास त्याचा सर्वच तेलांवर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खाद्यतेलात सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन व पामची विदेशातून मोठ्याप्रमाणात आयात होत असते. मात्र सरकारने ही आयात कमी केल्याने या दोन्ही तेलाचे भाव वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा: चोराचा 2,500 कि.मी. पाठलाग, २८ लाखांच्या दागिन्यांच्या लावला छडा
सात रुपये किलोने भाववाढ
वेगवेगळ्या कारणांनी तेलांची भाववाढ होत असताना सोयाबीन तेलाचा भाव पाहिला तर आठवडाभरात या तेलाचा भाव सात रुपये प्रतिकिलोने वाढला आहे. गेल्या आठवड्यात १३५ रुपये प्रतिकिलो असलेले सोयाबीन तेलसध्या १४२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. तसेच पामतेल देखील १३० रुपयावरून १३५ रुपयांवर पोहोचले आहे. तीळ तेलालाही २० रुपयांची वाढ झाली व ते २२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. शेंगदाणा, सूर्यफुल व करडई तेलाचे भाव मात्र स्थिर आहेत.
Web Title: Sarki Rise Price Edible Oil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..