बारडचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी

barad.jpg
barad.jpg


बारड, (ता. मुदखेड, जि. नांदेड) ः येथील नगरीचे सरपंचपद अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गास सुटले असून सुटले असल्याने मागासवर्गीय समाजासाठी एक नामी संधी समजली जात आहे. खुल्या प्रवर्गातील गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या मातब्बरांचा हिरमोड झाला असून गावचा कारभारी कोण हे ठरवण्याचा अधिकार लोकशाहीत गावकऱ्यांच्या हाती असल्याने या पदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता लागली आहे. 

लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध 
मुदखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून राजकीय पटलावर बारडचे नाव आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या सतरा आहे. या ठिकाणी खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि जमाती तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गा प्रवर्गातील मतदारांची संख्या जवळपास सारखीच आहे. नांदेड जिल्ह्यात राजकीय केंद्र म्हणून या गावची ओळख आहे. आजपर्यंत या गावाने राजकीय राजकीय क्षेत्रात आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, बाजार समिती अध्यक्ष, नगर परिषद उपाध्यक्ष असे जवळपास सर्व महत्त्वपूर्ण पदे भूषविल्याचा इतिहास आहे. परंतु कालांतराने पंचायत राज व्यवस्थेत आरक्षण प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गातील घटकांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध झाली. 


गावचा कारभारी कोण बनणार 
मुदखेड तहसील कार्यालयात (ता. १९) सकाळी ठीक ११ वाजता तालुक्यातील गावनिहाय आरक्षण सोडत तहसीलदार दिनेश झांपले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली आहे. बारड जिल्हा परिषद सर्कलमधील बारड ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण अनुसूचित जाती, नागेली सर्वसाधारण महिला, डोंगरगाव सर्वसाधारण, शेंबोली इतर मागासवर्गीय महिला, निवघा अनुसूचित जाती महिला, वैजापूर पारडी इतर मागासवर्गीय महिला, जवळा फाटक सर्वसाधारण महिला, बोरगाव नादरे सर्वसाधारण महिला, पाथरड सर्वसाधारण महिला, रेल्वे पाथरड सर्वसाधारण, सरेगाव इतर मागासवर्गीय प्रवर्ग, जवळा मुरार इतर मागासवर्गीय प्रवर्ग, धनज सर्वसाधारण इत्यादी गावचे आरक्षण या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेले आहे. बारड नगरीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आता प्रवर्गातील बौद्ध, मातंग, चर्मकार आदि वंचित घटकांना बारड नगरीचे प्रतिनिधित्व करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गावचा कारभारी कोण बनणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


मुदखेडच्या पन्नास गावच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
तालुक्यातील पन्नास गावच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरूवारी (ता.१९) रोजी मुदखेड महसूल प्रशासनाच्या ईमारतीत तहसीलदार दिनेश झांपले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली २०२०-२५ करिता सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या वेळी पंचायत समिती सभापती बालाजी सुर्यतळे, उपसभापती आनंदराव गादीलवाड, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी एस.एस. भोसीकर, लिपिक गजानन मठपती, विनोद मनवर, संचालक भिमराव कल्याणे, माधवराव शिंदे, बालाजी शिंदे, प्रल्हाद हाटकर, भाजपचे प्रविण गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय कुरे, पिंटू पाटील वासरीकर आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड गावचे सरपंच पद अनुसूचितजातीसाठी राखीव झाले आहे. सोडतीवेळी तालुक्यातील पन्नास गावातून पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आरक्षण गेल्यामुळे बत्ती गुल 
मुदखेड तालुक्याचे राजकारण बारड, मुगट, आमदुरा, माळकवठा, निवघा, रोहिपिंपळगाव, व पार्डी या प्रमुख गावातून चालत असते. तालुक्याच्या राजकारणात या गावातील पुढाऱ्यांचा सतत मोठा दबदबा राहिला आहे. आज आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीमुळे या गावातील मातब्बरांच्या स्वप्नांची धुळी झाली असून अनेक मातब्बर यांचे आरक्षण गेल्यामुळे बत्ती गुल झाली आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com