esakal | महावितरणचे संचालक सतीश चव्हाण यांच्या हस्ते हदगाव येथील थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड परिमंडळाचे पालकत्व असलेले महावितरण कंपनीचे संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचार व प्रसिध्दीकरिता लावलेल्या होर्डिंगचे अनावरण करण्यात आले.

महावितरणचे संचालक सतीश चव्हाण यांच्या हस्ते हदगाव येथील थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ता. एक मार्च ते ता. १४ एप्रिल २०२१ या ४५ दिवसांच्या कालावधीत सुरु करण्यात आलेले कृषी ऊर्जा पर्व नांदेड परिमंडळात उत्साहात सुरू करण्यात आले आहे. परिमंडळातील कृषीपंप वीजग्रहकांशी सुसंवाद साधण्यासाठी आलेल्या नांदेड परिमंडळाचे पालकत्व असलेले महावितरण कंपनीचे संचालक (वाणिज्य) सतिश चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचार व प्रसिध्दीकरिता लावलेल्या होर्डिंगचे अनावरण करण्यात आले.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडलेल्या अनावरण सोहळ्यास कार्यकारी अभियंता सिध्दार्थ रसाळ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री औरादे, उपकार्यकारी अभियंता श्री मार्लेगावकर, श्री भुसारी, सहायक अभियंता धैर्यशिल देशमुख, स्वप्नील जोशी, श्री गट्टूवार तसेच व्यवस्थापक मासं प्रांजली कांबळे, श्री अंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

हदगाव उपविभागातील थकबाकीमुक्त १२ शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देवून सत्कार

कृषी ऊर्जा पर्वा निमित्त हदगाव येथे आयोजीत केलेल्या शेतकरी ग्राहक मेळाव्यात हदगाव उपविभागातील महाकृषी ऊर्जा अभियानाचा फायदा घेत थकबाकी मुक्त झालेल्या १२ शेतकऱ्यांचा याप्रसंगी सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद देत १७८ कृषीपंप ग्राहक शेतकऱ्यांनी २८ लाख रुपयांचे वीज बील भरत थकबाकी मुक्त झाल्याबद्दल श्री चव्हाण यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. महाकृषी ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहे. कृषीपंपाच्या थकबाकीतून भरघोस दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पैसे भरूनही वीज जोडणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज जोडणी देण्याचाही या घोरणात समावेश आहे.

त्याचबरोबर सौर कृषी वाहिनीसाठी पडिक जमीन उपलब्ध करून दिल्यास एकरी दरवर्षी तीस हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. एकूणच सर्वार्थाने शेतकऱ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी व शाष्वत शेतीसाठी हे अभियान सुवर्णसंधी ठरणार आहे त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी ऊर्जा पर्वाचा लाभ घेवून थकबाकी मुक्त व्हावे असे आवाहनही मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना केले. या पंसंगी शेतकरी ग्राहकांच्या अडीअडचणींही जाणून घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला.


 

loading image