चांगली कारवाई :अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या ७० गोवंशाचे प्राण वाचविले- विजयकुमार मगर 

file photo
file photo

नांदेड : बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात गोवंशाची अवैधरित्या कत्तल होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी अन्यथा आम्ही कारवाई करु असा इशारा गोवंश प्रेमींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिला होता. यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करुन जवळपास ७० गोवंश जप्त करून त्यांना विविध गोशाळेत दाखल केले आहे. यात तीन वाहने आणि ७० गोवंश असा लाखोंचा ऐवज जप्त करून आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. नांदेड पोलिसांची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की नांदेड शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्तात व्यस्त असल्याचे पाहून काही गुन्हेगार आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. त्यात अवैधपणे गोवंशाची कत्तल करणारेही मागे राहिले नाहीत. नांदेड शहर व जिल्हायत गोवंशआंची अवैध रित्या कत्तल केल्या जाते. गोवंश हत्या बंदी कायदा असतांनाही मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत असते. यापूर्वीही पोलिसांकडून अवैध कत्तखान्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. दोन दिवसांवर आलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहरात ह्या कत्तली होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. अशा लोकांवर पोलिसांची करडी नजर असून गोवंशांची कत्तलीसाठी वाहतुक होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, कायदा कुणी हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. 

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई 

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मुस्लिम व हिंदू बांधवांच्या शांतता समिती बैठका घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. मात्र काही भागात अवैधरित्या गोवंशाची कत्तल व जनावरांची वाहतूक होत असल्याची तक्रार पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यावरुन पोलीस विभागाकडून तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्ह्यात पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरे नेणाऱ्यांची धरपकड करण्यात आली.

या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

यावेळी इतवारा, नांदेड ग्रामीण, अर्धापूर आणि हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. अर्धापूर येथे जवळपास पन्नास गोवंश, इतवारा भागातून पाच, नांदेड ग्रामीण भागातून आठ आणि हदगावमधून दहा असे जवळपास ७० गोवंश पोलिसांच्या कारवाईत जप्त झाले. या गोवंशाचा जीव वाचला. पोलिसांनी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तीन वाहने (एमएच३८-ई-३१९३, एमएच२६एडी-०६३५, एमएच२६-बीई-१८४९) जप्त केले. गोवंशाची वाहतुक करणाऱ्या १० आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध इतवारा, नांदेड ग्रामिण, अर्धापूर आणि हदगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुनहा दाखल करण्यात आला आहे. 

हे आहेत आरोपी

शाहरुख युसुफ पठाण, बशीर कुरेशी, शेख जावेद शेख अहेमद, सलिम कुरेशी, फिरोज सलीम कुरेशी, शेख मोहसीन शेख मसुद, अहेमद अजीम मोहम्मद अलीयोद्दीन, देवानंद जांबूतराव, निसार इसाक कुरेशी आणि श्री. वाघमारे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com