नांदेड : सावित्रीबाई फुले विद्यापीठाला विजेतेपद

नांदेड : सावित्रीबाई फुले विद्यापीठाला विजेतेपद

नांदेड : पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेचे(kabaddi competition) पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ(savitribai phule university pune) संघाने विजेतेपद व भारती विद्यापीठ पुणे(bharati university pune) संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडूंचे वैयक्तिक पारितोषिक पटकावून पुणेरी महिलांनी या स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. तिसरा क्रमांक एसएनडीटी विद्यापीठाला(sndt university) तर चौथे स्थान संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघास प्राप्त झाले. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान हर्षदा सोनवणे, निकिता पडवळ (सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे), मंदिरा कोमकर (भारती विद्यापीठ पुणे) या खेळाडूंना मिळाला.

नांदेड : सावित्रीबाई फुले विद्यापीठाला विजेतेपद
चिपळूण : ड्रोनद्वारे वाशिष्ठीचे होणार सर्वेक्षण; मुख्य अभियंता विजय गोगरे

स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ इनडोअर हॉलमध्ये कब्बडी स्पर्धा झाली. या स्पर्धेतील बाद व साखळी फेरीतील सर्वाधिक सामने जिंकून सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या संघात सिद्धी मराठे, हर्षदा सोनवणे, ऐशवर्य काळे, प्रतीक्षा खारेकर, पूजा कुमावत, जोती पवार, निकिता पडवळ, दीपाली काजळे, सुवर्णा लोखंडे, सुनंदा पवार, अंजली मुळे, नागिन्द्रा कुरा यांनी यशस्वी कामगिरी केली. संघाला सुवर्णा पाठारे व विद्या घोलप यांचे मार्गदर्शन मिळाले.

नांदेड : सावित्रीबाई फुले विद्यापीठाला विजेतेपद
रिंगरोडचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

अंतिम सामन्यात भारती विद्यापीठ पुणे संघाचा २५-२३ अवघ्या दोन गुणांनी सामना जिकूंन विजेतेपद पटकाविले. भारती विद्यापिठाला उपविजेतेपद मिळाले. विजेत्या संघाला नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करंडक दिला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त गणेश शेट्टी, राजू भावसार, दक्षिण मध्ये रेल्वे नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र सिंह, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव सर्जेराव शिंदे, डॉ. दीपक बच्चेवार, डॉ. परिहार, प्रा. उत्तम इंगळे, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. नवनाथ लोखंडे, डॉ. मनोज रेड्डी, लक्ष्मण बेल्लाळे, शंकर बुड्डे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मोघे यांनी केले तर डॉ. बच्चेवार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com