Nanded : स्क्रब टायफसपासून राहा सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor Advice

Nanded : स्क्रब टायफसपासून राहा सावध

नांदेड : पावसाळा सुरु होताच अनेक आजारांचा प्रकोप दिसून येतो. ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या विशेषतः गाजरगवतावर आढळणाऱ्या किड्याने चावा घेतल्याने स्क्रब टायफस रोगाचा प्रसार होत आहे. यापासून नागरिकांनी सावध राहावे. लक्षण दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवून उपचार घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

स्क्रब टायफस हा आजार आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ असा आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील आॅरियंटा सुटसुगामुशी नावाचा जिवाणी आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होता. ट्राॅम्बिक्युलिड माईटसचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात. ते चावल्यामुळे हा आजार होतो. या जिवाणूंचा आकार ०.२ ते ०.४ मिलीमीटर एवढा असतो. जिथे झाडे-झुडूप आणि गवत वाढलेले असते अशा ठिकाणी हे चिगर माईट््स जिवाणू असतात. या आजाराचे कीटक गवत, शेत, जंगल, लाॅन, तलाव, झरे अशा भागात आढळतात.

असा करावा उपचार

संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावे. घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झाडे झुडुपी नष्ट करावीत. घरातील उंदीर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे. घरातील साफसफाईवर विशेष लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे दिसताच डाॅक्टरांना दाखवावे.

अशी घ्यावी काळजी

कीटक नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा, झाडेझुडपात काम करताना पूर्ण बाह्याचे कपडे, हातमोजे, गमबूट वापरावेत, खुल्या जागी शौचाला जाणे टाळावे, झाडेझुडपात काम करून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत. स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आलेल्या घराच्या जवळील छोटी मोठी खुरटी झाडे झुडपे काढून टाकावीत. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाचे लक्षणे साधारणतः चिकन गुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते.

तीव्र ताप येणे, डोकेदुखी, सांधुदुखी, थंडी वाजणे, मळमळ होणे, चालताना तोल जाणे, सुस्ती चढणे, शरीरात कंपण सुटणे, कोरडा खोकला, निमोनियासदृश आजार, अंगावर चट्टे येणे, खाज, जखम होऊन खिपल पकडणे आणि काही रुग्णांमध्ये कीडा चावल्याच्या ठिकाणी व्रण येणे, आदी लक्षणे या आजाराची आहेत.

- डॉ. घनश्‍याम मनियार, नांदेड

Web Title: Scrub Typhus Infectious Diseases Symptoms Immediate Treatment Doctor Advice Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..