अडचणीतील शेतकऱ्यांवर बियाणे दरवाढीची टोळधाड....कोणती ती वाचा 

file photo
file photo

नांदेड : शेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे उपलब्ध होणारे ठिकाण म्हणून राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजची ओळख आहे. परंतु यंदा कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना महाबीजने दरवाढीचा दणका दिला आहे. सतराशे ते आठराशे रुपयाला मिळणारे बियाणे यंदा दोन हजार दोनशे वीस रुपयापर्यंत महागले आहे. शासनानेही यावर्षी सोयाबीन बियाणाला अनुदानही जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यावर एन पेरणीच्या हंगामात टोळधाड पडली नाही.

महाबीजसह इतर बियाणांचे दरही वाढले
मागील वर्षी पावसाळ्याच्या शेवटी अतिवृष्टी झाल्याने त्याचा बिजोत्पादनावर परिणाम झाला. परिणामी महाबीजसह खासगी कंपनीकडे बियाणे कमी प्रमाणात आल्याचे सांगत यंदा बाजारात सर्वच खाजगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांत दरवाढ केली आहे. यात शेतकऱ्यांत विश्वासाचे स्थान निर्माण केलेल्या महाबीजने यंदा जेएस ३३५ वाणासाठी विक्रेत्यांना प्रतिकिलो ७४ रुपये दर काढला आहे. यामुळे तीस किलो बियाणांची ठोक किंमत दोन हजार २२० रुपये होते. मागील वर्षी याच बियाणांची ठोक किंमत ५६ रुपये किलो होती. महाबीजने जेएस ९३०५ व ७१ या  वानाची किंमतही ७६ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढविली आहे. यामुळे बाजारात सोयाबीनच्या बॅंगने एमआरपी गाठली आहे.

महाबीजडूनच नफा मिळवण्याचा प्रकार
कोरोनाचे संकट तसेच बाजारात शेतीमालाचे पडलेले दर यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान देवून दिलासा देण्याची गरज असताना सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या महाबीजने शेतकऱ्यांकडूनच नफा मिळवण्याचा प्रकार सुरु केला आहे. या भाववाढीचा शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकप्रीय वाणाची दरवाड
सोयाबीन बियाण्याच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. जेएस-३३५ या वाणाची ३० किलोची किंमत पूर्वी एक हजार आठशे पर्यंत होती. ती आता दोन हजार २४० रुपयांवर पोचली आहे. सोयाबीनच्या जेएस-९३०५ या वाणाचे बियाणेही प्रतिकिलो ७४ रुपये ठोक दर काढला आहे. यामुळे या बियाणाची बॅंक दोन हजार तीनशे रुपयांवर पोचली आहे. याशिवाय इतर वाणांची देखील दरवाढ महाबीजकडून करण्यात आली आहे.

यंदा बियाणांवर अनुदानही नाही
मागीलवर्षी शासनाकडून सोयाबीन बियाणासाठी अनुदान दिले होते. यात जेएस ३३५ या वाणासाठी प्रतिकिलो दहा रुपये तर इतर वाणासाठी प्रतिकिलो २५ रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. यंदा शेतकऱ्यांना अनुदान तर नाहीच परंतु दरात मोठी वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

बिजोत्पादकांना पाच हजार दोनशे रुपये दर दिला 
यंदा बिजोत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी पाच हजार १५० ते पाच हजार २०० रुपये दर दिल्यामुळे बियाणांच्या दरात वाढ झाल्याची माहिती महाबीजकडून मिळाली. यंदा सोयाबीनसाठी शासनाकडून अनुदानही जाहीर झाले नसल्यामुळे दर वाढल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com