esakal | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. प्रभाकर पुरंदरे नांदेडमध्ये निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

प्रभाकर पुरंदरे नांदेड कर्मभूमी मानून येथेच स्थायिक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या फळीतील दिग्गजांचा त्यांचा निकटचा संपर्क होता. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. प्रभाकर पुरंदरे नांदेडमध्ये निधन 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक तथा नांदेडच्या अभिनव भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर दिनकर पुरंदरे (वय ९६) यांचे शनिवारी (ता.२६) निधन झाले. त्यांच्यावर गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपच्या माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे यांचे ते वडिल तर भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांचे ते सासरे होत. 

श्री. पुरंदरे व्यवसायाने डॉक्टर होते. शेवटपर्यंत सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. संघाचे स्वयंसेवक, घोषप्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या. त्यांना आपल्या मामांकडून संघ विचारांचे बाळकडू मिळाले होते. विशेष म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी डॉ. पुरंदरे यांची अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी ओळख करून दिली होती. 

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात अखेर उपस्थिती भत्ता आणि पोषण आहाराचे वाटप

वाजपेयींनी पंडितजींच्या समोर हिंदू तन मन ही कविता सादर केली होती त्याचे डॉ. पुरंदरे साक्षीदार होते. ती आठवण लक्षात ठेवून अटल बिहारी वाजपेयी जेव्हा नांदेड दौऱ्यावर आले तेव्हा स्वतःहून डॉ. पुरंदरे यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली होती. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले डॉ. पुरंदरे यांची वैद्यकीय कर्मभूमी आफ्रिका होती. मात्र त्या ठिकाणी ते रमले नाहीत. मातृभूमी त्यांना खुणावत होती. त्यामुळे ते भारतात आले व काहीही संबंध नसताना नांदेड कर्मभूमी मानून येथेच स्थायिक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या फळीतील दिग्गजांचा त्यांचा निकटचा संपर्क होता. 

हे देखील वाचा - कर्जमाफीच्या फंड्याने शेतकऱ्यांची पत झाली खराब

नांदेड मधील जिव्हाळ्याची संकल्पनाच संपली
डॉक्टरांचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध काही निराळाच. त्यांचे clinic आमच्या येथे जवळ जवळ ४० वर्षे होते. त्यामुळे त्यांना जवळून अनुभवता आले. त्रासात असलेल्या रुग्णाचा अर्धा त्रास त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे आणि उत्साही बोलण्यामुळेच कमी व्हायचा. अचूक रोगनिदानही आज दुर्मिळ झालेली गोष्ट डॉक्टरांकडे जणू पाणी भरत असे! अत्यंत कमी म्हणजे २० रुपये तपासणी फीमध्येच औषधी सुद्धा डॉक्टर जवळचीच द्यायचे, ही तर आता यापुढे दंतकथा वाटेल. वयोमानानुसार डॉक्टरांनी पुंडलिकवाडी येथील clinic बंद केले; पण आमच्यासारख्या असंख्य रुग्णांनी त्यांच्या घरीच रांगा लावल्या. त्याचा त्रास न मानता डॉक्टरांनी घरीही रुग्णसेवा चालू ठेवली अगदी शेवटपर्यंत. 

येथे क्लिक कराच - नांदेड - अंत्यविधीसाठी शांतीधामला मिळाला आधार, फाउंडेशनचा मदतीचा हात; शंभर बेवारस - कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधीसाठी जैव इंधन पुरवणार

डॉक्टरांचं व्यक्तिमत्त्व बहूआयामी. प्रतिष्ठित आणि रुग्णाच्या प्रेमादरास पात्र डॉक्टर म्हणून निरंतर रुग्णसेवा, राजकारण, समाजकारणही यशस्वीपणे केले. साहित्यशास्त्राचा व्यासंगही तेव्हढाच दांडगा. कोणत्याही स्थितीत कायम प्रसन्न राहणे ही स्थितप्रज्ञाची स्थिती त्यांनी प्राप्त केलेली! "आनंदानें जगण्यासाठी, आनंदातूनच मनुष्याची निर्मिती झाली" हे तैत्तिरीयोपनिषदातील तत्वज्ञान डॉक्टरांच्या रूपाने जणू साकार झालेले! त्यांच्या निरंतर, निरलस, निरपेक्ष सेवेचे फलित म्हणून सद्गतीवर त्यांचा अधिकार सिद्ध आहेच. त्यांचे जीवन आम्हाला कायम प्रेरणा देत राहो, अशी प्रार्थना त्यांच्या सहवासातील व्यक्तिंनी दिली.