खळबळजनक घटना : नांदेडच्या दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह शिपाई निलंबीत

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या शासकिय निवासस्थानी तर्रर्र दारुच्या नशेत घुसून कारागृहातील दोन तुरुंगाधिकारी आणि एका कर्मचाऱ्याने अत्यांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त महासंचालक (कारागृह) पुणे यांनी प्रस्ताव मिळताच तिघांनाही निलंबीत केल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती. 

कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे हे आपले शासकिय कर्तव्य बजावून ता. पाच डिसेंबर रोजी आपल्या शासकिय निवास्थानी गेले. कार्यालयीन कामकाजाचे कारण पुढे करत तुरुंगाधिकारी व एक शिपाई यांनी तर्रर्र दारुच्या नशेत श्री. चांदणे यांचे घर गाठले. कुठलीही परवानगी न घेता त्यांच्या घरात घुसले. यावेळी चांदणे हे आपली पत्नी व मुलगी यांच्यासोबत बैठकीत चर्चा करत बसले होते. समोर महिला असतानाही या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ सुरु केली. एवढेच नाही तर श्री. चांदणे यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. वेळ रात्री दहाच्या सुमाराची. 

यासंदर्भात वजीराबाद पोलिस ठाण्यात रामराजे चांदणे यांच्या फिर्यादीवरुन तुरुंगाधिकारी उत्तरेश्वर निवृत्ती गायकवाड, किशोर महादेव वारके आणि शिपाई संचीन शंकरराव पिंगलवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वजिराबाद पोलिसांना अद्याप तिन्हीही आरोपी सापडले नाहीत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री. जाधव करत आहेत. 

घडलेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांननी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. या अहवालावरुन अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) पुणे यांनी उत्तरेश्वर गायकवाड, किशोर वागरे आणि सचीन पिलंगवार यांना निलंबीत केले आहे. त्यांच्यावर वरिष्ठांशी हुज्जत घालणे, कर्तव्यात कसुर करणे, कारागृह प्रशासनाची बदनामी होईल असे कृत्य करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

National Census 2027: Vahedpurwadi Leads with 100% Self-Enumeration
Nanded News
Nanded News: नोटीस देऊनही बसस्थानकाचे काम ठप्प; ऐन पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय अटळ; कंत्राटदारावर कारवाईची मागणी
Nanded News
Marathi News Esakal
www.esakal.com