Bus Accident : बस रिक्षाची धडक, दोघे गंभीर; अकरा प्रवासी जखमी, करडखेडजवळील घटना
Accident News : देगलूरहून उदगीरकडे जात असलेल्या बस आणि ऑटोरिक्षाची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. अपघात करडखेड येथील दाल मिलसमोर घडला. बसचालक आणि सहायक वाहतूक अधीक्षकांनी जखमींना मदत केली.
देगलूर : देगलूरहून उदगीरकडे जात असलेल्या उदगीर आगाराची बस आणि आॅटोरिक्षाची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर, तर ११ प्रवासी जखमी झाले. हा अपघात करडखेड येथील दाल मिलसमोर गुरुवारी (ता.२६) सकाळी घडला.