esakal | नांदेड जिल्ह्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू, वाचा नेमके कुठे काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याच्या विविध पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याती एकाने मात्र खासगी कर्जाच्या वसुलीपायी आपल्या राहत्या गरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नांदेड जिल्ह्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू, वाचा नेमके कुठे काय घडले?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याच्या विविध पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याती एकाने मात्र खासगी कर्जाच्या वसुलीपायी आपल्या राहत्या गरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. एक सप्टेंबर रोजी राधिकानगर भागात सकाळी घडली. 

तरोडा खु. भागातील राधिकानगरमधील विजयलक्ष्मी अपार्टमेन्टमध्ये राहणारा रत्नाकर अनंतराव कुलकर्णी (वय ४७) हा मार्केटींगचे काम करत होता. त्याने ओळखीचे असलेले देवानंद पत्रे याला फायनान्समधून १५ लाख रुपये काढून दिले होते. देवानंद पत्रे याने काही दिवस फायनान्साचे हप्ते भरले. त्यानंतर त्याने भाड्याने घेतलेले घर बदलले. त्यानंतर हप्ते भरणे बंद केले. मात्र या व्यवहारात मध्यस्थी असणाऱ्या रत्नाकर कुलकर्णी यांनाच पैशाचा तगादा लावला. अखेर रत्नाकर कुलकर्णी याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने देवानंद पत्रे आणि त्याचा भाऊ शिवानंद पत्रे हे माझ्या आत्महत्येस कारणीभूत असल्याची चीठ्ठी लिहून ठेवली होती. यावरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात वनमाल कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले करत आहेत.

हेही वाचा - भाजपचे ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहंचा- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

देगलूर अपघात

देविदास माधव पांड्ये (वय ३५) रा. बल्लुर (ता. देगलुर) हा रस्त्याने ता. ३० आॅगस्ट सकाळी साडेआठच्या सुमारास पायी जात होता. यावेळी दुचाकी (एपी२५-आर-०३६२) चालकाने त्याला चाकुर फाटा येथे जोराची धडक दिली. यात देविदास पांड्ये याचा उपचार घेताना मृत्यू झाला. या प्रकरणी देगलुर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. परगेवार करत आहेत.

हदगाव गळफास घेऊन आत्महत्या

हदगाव शहराच्या नवीआबादी येथील अमोल माणिक कांबळे (वय २६) याने ता. दोन सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याचे फौजदार श्री. विठुबोणे यांनी सांगितले. 

धर्माबाद गळफास घेऊन आत्महत्या

समराळा (ता. धर्माबाद) येथील अंकुश राम जाजेवार (वय २४) याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ता. दोन सप्टेंबर रोजी घडकीस आली. नामदेव शंकर जाजेवार यांच्या माहितीवरुन धर्माबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हवालदार श्री. नागुलवार करत आहेत. 

नायगाव फ्रीजच्या स्फोटात मृत्यू 

नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील मारोती तानाजी देवदे (वय २५) याच्या घरच्या फ्रिजचा ता. २९ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमरास स्फोट झाला. यात तो भाजला होता. त्याच्यावर नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तानाजी देवदे यांच्या माहितीवरुन कंटुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपास पोलिस नाईक श्री. बारी करत आहेत.

तसेच याच तालुक्यातील रातोळी कॅम्प येथील साईनाथ राजाराम पोटफोडे (वय २८) याने कुठल्यातरी कारणावरुन ता. ३१ आॅगस्ट विष प्राशन केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुकेशनी पोटफोडे यांच्या माहितीवरुन नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. जी. पाटेकर करत आहेत. 

किनवटमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गोविंद विश्‍वनाथ गुट्टे (वय ५०) रा. बोंडखेडा यांनी ता. १६ जुलै २०२० रोजी आदिलाबाद (तेलंगना) येथे विष पीऊन आत्महत्या केली. मिळालेल्या वैद्यकीय कागदपत्राच्या आधारे ता. दोन सप्टेंबर रोजी किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मित्रवंदा गुट्टे हिच्या माहितीवरुन किनवट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार श्री. पांढरे करत आहे.