esakal | शंकर नागरी बँक प्रकरण : नायजेरियन युवकासह गुजरातमधून आणलेल्यास पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिवाजीनगर पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या ग्रीटन नोए़डा येथून एका नायजेरीयन युवकास अटक केली

शंकर नागरी बँक प्रकरण : नायजेरियन युवकासह गुजरातमधून आणलेल्यास पोलिस कोठडी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नविन मोंढा परिसरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय शाखेतून साडेचौदा कोटी रुपयाचा अपहार करण्यात आला होता. हा प्रकार अज्ञात हॅकरने विविध खातेदारांच्या नावावर हे पैसे वळविली होते. मात्र नांदेड पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून जवळपास पंधराहून अधिक आरोपींना अटक केली. यात काही परदेशी महिलांचाही समावेश आहे. पुन्हा एकदा विमानतळ पोलिसांनी गुजरातमधून एकाला अटक केली तर शिवाजीनगर पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या ग्रीटन नोए़डा येथून एका नायजेरीयन युवकास अटक केली. त्याच्या बँक खात्यावरील सर्व रक्कम सील केली आहे. या दोघांनाही न्यायाधीश हिवाळे यांनी चार मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय शाखेतून १४ कोटी ५६ लाख रुपये हॅक करुन अनेक खातेदारांच्या नावे वळविले होते. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात बँक सरव्यवस्थापकांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला.

दाखल झालेल्या गुन्ह्यात आजपर्यंत काही विदेशी, देशी अशा १५ पुरुष आणि महिलांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या वतीने विमानतळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी या गुन्ह्यात यापूर्वीही मुंबई येथून काही आरोपींना अटक करुन आणले होते. सध्या अटक सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुन्हा या पथकाने सायबर सेलच्या फौजदार अनिता चव्हाण, श्री. आलेवार, प्रविण राठोड यांच्या मदतीने गुजरातच्या वापी जिल्ह्यातील चंदन प्रेमसिंग राय ( वय 36) रा. हाउस नंबर १०१,पन्नालाल की चावल, जेके किराना जवळ, जिल्हा वलसाड (गुजरात) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५३ हजार २०० रुपये रोख, बँक एटीएम, पासबुक जप्त करुन वापी न्यायालयातून हस्तांतरण प्राप्त करुन नांदेडला आणले आहे.

तसेच शिवाजीनगर पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि वाहूळे यांनी आपले सहकारी शिलराज ढवळे, बालाजी रावले आणि विशाल अटकोरे यांना सोबत घेऊन उत्तरप्रेदश गाठले. त्यांनी ग्रीटन नोएडा येथून इम्राण उस्मान सायबु (वय २७) याला अटक केली. सोमवारी (ता. २२) सकाळी वजिराबाद पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही चार मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 
--