

Shocking Misconduct by Drunk Teacher in Shekapur School
sakal
माहूर: माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार काल ता.५ रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणा-या या दारूड्या शिक्षकाला निलंबित करून त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ पालकांकडून करण्यात आली आहे. माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शेकापूर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील गैरवर्तनाचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून सदरचा व्हिडीओ काल ता.५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.