शिक्षक सेनेने भरविला भुकेल्यांच्या तोंडी घास

NND30KJP01.jpg
NND30KJP01.jpg

नांदेड : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने ज्ञानदानाबरोबरच आपले सामाजिक उत्तर दायित्व निभावत नांंदेड जिल्हा प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी ठेवलेल्या परप्रांतीय कामगारांना अन्नदानाच्या माध्यमातून भुकेल्यांच्या तोंडी घास भरवत सामाजिक सेवाभाव जागृत केला आहे. शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील लोकमान्य मंगल कार्यालयात झालेल्या अन्नदान कार्यक्रमात शिक्षक सेनेचे अध्यक्ष संतोष अंबुलगेकर, सचिव रवी बंडेवार, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष तानाजी पवार, सचिव तथा उपप्राचार्य परशुराम येसलवाड, उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, शहाजी सुनपे, संपर्क अधिकारी दत्ता भुत्ते, एम. जी. चामे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपत नकाते, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, काॅ. के. के. जामकर यांची उपस्थिती होती.

परराज्यातील ७१ कामगार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लाॅकडाऊनमुळे बेरोजगार झालेले परप्रांतातील तामिळनाडू, उत्तरप्रदेश, राजस्थान येथील एकूण ७१ कामगार युवक लोकमान्य मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. तेथे प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेत दोन दिवस सकाळी नाश्ता देण्यात आला. त्यातील सामाजिक उत्तरदायित्व समजून घेत शिक्षक सेनेने आपला सहभाग नोंदवला.

तरोडा मंगलकार्यालयात ७९ अडकले
तरोडा बु. येथील विश्वलक्ष्मी मंगलकार्यालयातही जागृती साखर कारखाना रेणापूर येथून कानपूरकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील ६१ जण वास्तव्यास आहेत. त्यात टँकरमध्ये बसून आंध्रप्रदेशाकडे जाणाऱ्या १८ विद्यार्थ्यांनाही येथेच स्थानबद्ध करण्यात आले आहे. तेथे शिक्षक सेनेकडून फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटाईझर वाटप 
पावडेवाडी नाका परिसरात युपी बिहार येथील दहा-बारा कामगार लाॅकडाउनमुळे अडकून पडले आहेत. काम बंद असल्यामुळे आणि गावी जाता येत नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. येथेही शिक्षक सेनेकडून अन्नधान्य व इतर साहित्याच्या किट वाटप करण्यात आल्या. तसेच तरोडा नाका, अण्णाभाऊ साठे चौक, राज काॅर्नर, पावडेवाडी नाका, छत्रपती चौक येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना संघटनेकडून सॅनिटाईझर बॉटलचे  वाटप करण्यात आले. 

शिक्षक सेनेच्या उपक्रमाला प्रतिसाद 
शिक्षक सेनेच्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळत असून प्रमोद अटकेलवार, महिला संघटक यमुना पवार, अर्धापूर तालुकाध्यक्ष बस्वराज मठवाले, हिमायतनगर तालुकाध्यक्ष आनंदा सुर्यवंशी, परमेश्वर गीते, पुरुषोत्तम मोकळे, किशोर देशमुख, संपर्क अधिकारी चंद्रकांत भंडारे, पोलिस कर्मचारी संदीप राठोड, होमगार्ड ए. एल. देशमुख, चंद्रकांत काळेवार, शिक्षक नेते पांडुरंग कोकुलवार, नागोराव जोगदंड आदींनी परिश्रम घेतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com