कोटा येथील ४८ विद्यार्थी लवकरच परतणार

शिवचरण वावळे
Wednesday, 29 April 2020

देशाच्या काना कोपऱ्यात शेकडो विद्यार्थी, रोजमजुरदार ‘लॉकडाउन’मुळे अडकुन पडले आहेत. ‘लॉकडाउन’चा दुसरा टप्पा संपत आला. त्यानंतर लॉकडाउनचा तीसरा टप्पा सुरु होण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व घरापासून दूर असणाऱ्या प्रत्येकास आपल्या परिवारात परतण्याची प्रत्येकास ओढ लागली आहे. यात नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

नांदेड : कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेल्या परंतु, लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७२ बस बुधवारी (ता. २९) धुळे आगारातून रात्री कोट्याकडे रवाना झाल्या आहेत. यामुळे लॉकडाउनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये नांदेडच्या ४८ आणि हिंगोली जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेल्या परंतु, लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या राज्यातील एक हजार ७६४ विद्यार्थ्यांना घरी जाण्याची ओढ लागली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांना सोशल मीडियाद्वारे आवाहन केले होते. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत या विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा- भूकंपाच्या धक्क्याने घाबरू नका, काळजी घ्या... कोण म्हणाले वाचा
राजस्थानातील कोटा येथे आयआयटी, जेईई, तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी जात असतात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेले आहेत. परंतु, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाउनची घोषणा झाली. यामुळे विद्यार्थी कोटा येथेच अडकून पडले आहेत.

हेही वाचले पाहिजे- लॉकडाउन : धान्यासाठी गावकऱ्यांची पायपीट थांबेना! तहसीलदारांच्या आदेशाची होतेय पायमल्ली

राज्यात परत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून घरवापसी करण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत राज्य सरकारने या सर्व विद्यार्थ्यांना स्वगृही परत येण्यासाठी जवळपास ७० बसची व्यवस्था केली. नांदेड जिल्ह्यातील ४८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासाठी नांदेडशिवाय हिंगोली जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण ५७ विद्यार्थ्यांना तीन बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या नांदेड विभागाचे परिवहन अधिकारी अविनाश कचरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 Students From Kota Will Return Soon Nanded News