esakal | नांदेडच्या आसना बायपास येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साध्या पध्दतीने 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण आणि शहीद जवानांना अभिवादन.

नांदेडच्या आसना बायपास येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साध्या पध्दतीने 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सामाजिक राजकारणाचा वसा जपत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेचा शुक्रवारी (ता. १९) 54 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारत- चीन सीमेवरती शहीद झालेल्या भारतीय जवानांना अभिवादनही करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे जाळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. शिवसेना ही केवळ अन्यायाविरुद्ध बंड करून उभी राहणारी  राजकीय पक्ष नाही तर शेतकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव रस्त्यावर उतरणारा सामान्य नागरिकांच्या हितासाठी झगडणारा पक्ष म्हणून ही शिवसेनेची ओळख आहे. प्रत्येक संकटकाळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मदतीचा थेट हात पुढे करणाऱ्या शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आपले मत व्यक्त केले. याच वेळी भारत- चीन सीमेवर सुरू असलेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना अभिवादनही करण्यात आले.

हेही वाचासावधान : दोन महिण्यानंतर पिरबुऱ्हाननगरमध्ये कोरोनाचा शिरकाव
 
अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरणारा पक्ष

जिल्हा समन्वयक धोंडू पाटील यांनी शिवसेनेच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून दिली. हिंदुत्ववादी विचारांची पेरणी करणाऱ्या आणि हिंदुत्ववादासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शिवसैनिक आणि शिवसेनेचा तळागाळातील लोकांपर्यंत असलेला हा संपर्क अधिक वाढविण्याची गरज आहे. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारातील शिवसेना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

वर्धापन दिनास यांची होती उपस्थिती

आयोजित करण्यात आलेल्या या वर्धापन दिनास नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमश मुंडे, सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोजराज भंडारी,  प्रकाश मारावार, दयाल गिरी, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, निखिल लातूरकर, शहरप्रमुख सचिन किसवे, तालुकाप्रमुख जयवंत पाटील, युवासेनेचे माधव पावडे, उपशहरप्रमुख रमेश कोकाटे, दर्शनसिंग सिद्धू, माजी नगरसेवक केदार गिरी, श्याम वानखेडे, आनंद जाधव, बाळासाहेब देशमुख, अमोल राठोड, गजानन कोकाटे, पिंटू कोकाटे आदींची उपस्थिती होती.