

Devotional Zeal Peaks as ‘Bhole Ki Baraat’ Draws Huge Crowds
Sakal
नांदेड : महाशिवरात्रीनिमित्त रविवारी शहरासह जिल्हाभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी केलेल्या गर्दीमुळे शिवालये दुमदुमून गेली. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेले. विशेष आकर्षण ठरलेल्या फुलांच्या सजावटीमुळे मंदिरांना नवीन रूप प्राप्त झाले. तसेच ‘भोले की बारात’ आणि ‘शिव-शक्ती विवाह सोहळ्या’च्या आयोजनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते.