नांदेड : बैलगाडीतून न्यावे लागते रुग्णांना

गावाला अजूनही रस्ताच नाही; एका रुग्णाचा वाटेतच मृत्यू
Shivni village has no road Patients have to face problems transported by bullock cart
Shivni village has no road Patients have to face problems transported by bullock cartsakal

शिवणी : मांजरी (ता.किनवट) या गावाला साधा रस्ता नसल्याने हलाखीच्या परिस्थितीमध्ये बैलगाडीने रुग्णाना दवाखान्यात नेतांना रुग्ण मरण पावतो आहे. ही घटना नुकतीच घडली आहे. काही आदिवासी गावांमध्ये अजूनही कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासी माणसं जीवन मरणाशी झुंज देत आहेत. आधुनिक संगणकाच्या युगात साध्या रस्ताच्या सुविधा अजुनही उपलब्ध होत नसेल तर हा घोर अन्याय नव्हे का? येथील प्रशासनाला आता तरी जाग येईल का? असा प्रश्न आदिवासी जनतेतून विचारला जात आहे.

किनवट तालुक्यातील जलधऱ्यांपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वागदरी व मांजरी माथा या गावांना शासकीय योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, किनवटच्या तहसीलदार मृणाली जाधव, भूमी अभिलेखेचे पेंदोर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना सोबत घेऊन जंगलातील कच्चा असलेल्या रस्त्यावरून प्रवास करून वाघदरी व मांजरी माथा येथील आदिवासी नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झालीत पण खोऱ्यात वसलेल्या वागदरी व मांजरी माथा ही गावे भौगलीक सोयी सुविधेपासून वंचित असल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी येथील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा काय आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी महसूल आकार बंदी करुन गावाला प्रथम दर्जा देणे आणि वन हक्क कायद्यांतर्गत दावे मंजूर करून त्यांना जमिनी देणे. आरोग्याच्या सोयी-सुविधा, घरकुल, राशन कार्ड, पाणीपुरवठा योजनेचा लाभ देण्यासाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणार असल्याची माहिती भेटीदरम्यान गावकऱ्यांना दिली.

भेट दिल्याच्या दोन दिवसातच मांजरी येथील माधव खुडे (वय ६५) यांना आजारी असल्याने उपचारासाठी बैलगाडीतून जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने या रुग्णांचे वाटेतच निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली आहे. हे गाव जलधरा गट ग्रामपंचायत असल्याने या गावाचे वास्तव्य १९६१ पासून आहे. जंगल मोठ्या प्रमाणात असून या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने या गावातील नागरिकांना गेल्या साठ वर्षापासून त्रास सहन करावा लागतोय.

जलधरा येथील गावाशेजारी तलाव असून हा तलाव नाल्यावर बांधला असून पावसाळ्यात या नाल्यावर पुल नसल्याने पायी नाल्यातुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा रस्ताही पावसाळ्यात अनेक वेळा बंद पडतो. या दोन गावातील लोकसंख्या अंदाजे पाचशे असून मांजरी माथा हे गाव पेसा अंतर्गत येत असून गेल्या वीस वर्षापासुन रस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचेही या गावातील ग्रामस्थांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com