धक्कादायक : महापालिकेत एकाने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 September 2020

या प्रकरणात संबंधीतावर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या इमारतीत आयुक्त यांच्या कक्षासमोर ता. दोन सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. 

नांदेड : वजिराबाद चौकात लावलेले होर्डींग्ज का काढले म्हणून एकाने चक्क अंगावर पेट्रोल टाकून आत्मह्त्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात संबंधीतावर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या इमारतीत आयुक्त यांच्या कक्षासमोर ता. दोन सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. 

शहरातील वजिराबाद भागात राहणारा अनुप श्रीराम आगाशे याने वजिराबाद चौकात एक होर्डांग्ज लावले होते. ते होर्डींग्ज महापालिकेच्या वतीने काढण्यात आले. ते विनापरवानगी लावल्याचे सांगण्यात आले. होर्डींग्ज का काढले म्हणून याचा राग डोक्यात धरुन अनुप आगाशे हा महापालिकेत ता. दोन सप्टेंबर रोजी दुरी एकच्यासुमारास गेला. जातेवेळेस त्याने पेट्रोल सोबतत नेले होते. तेथे उपस्थित असलेले क्षेत्रीय अधिकारी प्रकाश गच्चे यांच्याशी वाद घातला. माझे होर्डींग्ज का काढले म्हणून महापालिकेत आरडाओरडा करुन सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतुन घेतले. पेटवून घेत असतांना त्याला उपस्थितांनी ताब्यात घेतले. त्याच्या गोंधळामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

हेही वाचा कोरोनाची कुंटूर पोलीस ठाण्यात इंट्री : एक अधिकारी पाच कर्मचारी पाॅझिटिव्ह -

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

क्षेत्रीय अधिकारी प्रकाश गच्चे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात अनुप श्रीराम आगाशे याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करुन शासकिय कार्यालयात गोंधळ घालून दहशत पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. सय्यद करत आहेत. 

इतवारात एक लाख ३२ हजाराची घरफोडी

नांदेड शहरातील मोमीनपूरा भागात राहणारे व्यापारी अब्दुल खवी अब्दुल मजीद याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी ता. दोन स्पटेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या सुमारास घुसुन चोरी केली. यावेळी चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे चार तोळे दीड ग्राम वजनाचे दागिणे व नगदी सात हजार असा एक लाख ३२ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अब्दुल खवी यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Attempt by a person in the Municipal Corporation to throw petrol and burn it nanded news