
या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मयत शेक-यांनी चिठ्ठी लिहून आपली जीवन यात्रा संपविल्याने प्रशासनाच्या वेळकाढूपणा पुन्हा ऐरणीवर
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातून जाणा-या तुळजापूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 साठी संपादन केलेल्या शेत जमिणीचा मावेजा मिळण्यासाठी उशिर होत असल्यामुळे शहरातील एका तरुण शेतक-यानी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. तीन ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मयत शेक-यांनी चिठ्ठी लिहून आपली जीवन यात्रा संपविल्याने प्रशासनाच्या वेळकाढूपणा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मावेजाचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून प्रलंबीत आहे. या भागातील शेतक-यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे वारंवार निवेदन देवून पाठपुरावा केला आहे. आज न उद्या मावेजा मिळेल या आशेवर आसलेल्या शेतक-याला शेवटी आपले जीवनच संपावे लागले आहे.
शहरातील अहिल्यादेवी नगरातील रमेश पुंडलिक बारसे (वय 42) यांचे अर्धापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या जमीनी अर्धापूर पुर्व वळण रस्त्याच्या कामासाठी संपादित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 साठी 16 गुंठे संपादित केली आहे. अर्धापूर शिवारातील जमीनीला जादा मावेजा मिळावा ही मागणी शेतक-यांची होती. हा प्रश्न गेल्या तीन वर्षापासून प्रलंबीत आहे.
शेत जमीनी मावेजा आज न उद्या मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. मयत शेतकरी बारसे यांनी कंटाळून आपल्या रहात्या घरी छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मयत शेतक-या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात महामार्गसाठी संपादित जमीनचा मावेजा मिळत नसल्यामुळे आत्महत्या करित आसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मयत शेतक-याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,आई आसा मोठा परिवार आहे. मयत शेतक-याच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
संपादन- प्रल्हाद कांबळे