धक्कादायक : पतीचा अपघातात मृत्यू, मात्र घडले भलतेच, काय आहे प्रकरण वाचा...

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 12 August 2020

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा निर्घुण खून, तिघांना पोलिस कोठडी

नांदेड : अनैतीक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नीने ठरविले. दुचाकीच्या अपघातात ठार झाल्याचा बहाणा जास्त वेळ टिकला नाही. अखेर हे प्रकरणाची सत्यता पुढे आली असून दोन प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून करुन अपघात झाल्याचे दाखविले होते. मात्र पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या सुक्ष्म तपासात सत्यता पुढे असून पत्नीसह तिच्या दोन्ही प्रियकरांना अटक केली. तिघांनाही बुधवारी (ता. १२) न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

मुदखेड तालुक्यातील निवघा येथील गंगाधर सूर्यतळे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक केली आहे. ता. सात ऑगस्ट रोजी गंगाधर सूर्यतळे हे पत्नीसह दुचाकीवरून निवघ्याकडे निघाले असताना रस्त्यात अपघात होऊन यात गंगाधर सूर्यतळे यांचा मृत्यू झाला. मुदखेड पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास थांबला होता.

हेही वाचाया भाजीच्या उत्पन्नापासून मिळू शकतात भरपूर पैसे; शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या सुक्ष्म नजरेतून सत्यता पुढे

मात्र या घटनेबाबत वैद्यकीय अहवाल व पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या नजरेतून अपघात नसल्याचे खटकले. त्यांना संशय आल्याने ही घटना अपघात नसून खून असल्याने काहींनी पोलिसांना सांगितले. याकामी नगरसेवक ॲड. कमलेश चौदंते, पंचायत समिती सभापती बालाजी सूर्यतळे निवघेकर, शिवसेनेचे भोकर विधानसभाप्रमुख विश्वंभर पाटील पवार यांनी पोलिसांना तपासात मदत केली. त्यानंतर पोलिसांचे लक्ष वेधले. त्यांनी तपासाला सुरुवात केली.

न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले

पोलिसांनी मयताच्या पत्नी त्रिशला हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी अनैतीक संबंधाला अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पती गंगाधर सूर्यतळे याचा खून केल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक श्री. निकाळजे यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी महिलेसह तिच्या दोन्ही प्रियकरांना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी बुधवारी (ता. १२) रोजी मदखेड न्यायालयसमोर हर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Husband's death in an accident, but it happened, read the case nanded news