नांदेडातील धक्कादायक प्रकार : सोन्यासाठी महिलेचे तोडले कान 

file photo
file photo

नांदेड : हिमायतनगर येथील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात अनोळखी दोन चोरट्यांनी प्रवेश करून वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या जबरीने  तोडून घेतल्या. यात महिलेच्या दोन्ही कानाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पतीस मारहाण करण्यात आल्याची घटना ता. 15 जुलै रोजी घडली.   

याबाबत अधिक माहिती अशी की हिमायतनगर येथे हे शोभा सुरेश देशपांडे (वय ७०) ही महिला आपल्या अंध पतीसोबत राहते. ता. 15 जुलैच्या रात्री तिच्या पत्र्याच्या घरात अनोळखी दोन चोरटे घुसले. त्यांनी वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याच्या साडेतीन हजार रुपये किंमतीच्या बाळ्या मागितल्या. परंतु सदर महिलेने बाळ्या देण्यास नकार दिल्याने जबरीने तिच्या कानातील बाळ्या चोरट्यांनी तोडून घेतल्या. यात महिलेच्या दोन्ही कानाला गंभीर दुखापत झाली आहे. घरातील गोंधळ लक्षात येताच तिचा पती समोर आला. मात्र त्याला दिसत नसल्याने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांनी त्यांनाही मारहाण करून ढकलून दिले. साडेतीन हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. शोभा सुरेश देशपांडे यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध घरात घुसून जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस डी. एस. इंगळे करीत आहेत.

एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला 

मुखेड - दुसर्‍या घटनेत पत्रे टाकण्याच्या कारणावरुन एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील बालाजी धोंडीबा गायकवाड (वय ४५) हे आपल्या घराच्या पाठीमागे रिकाम्या प्लॉटवर पत्र्याचे शेड करत होते. परंतु यासाठी त्याला भावकीतील व्यक्तीचा विरोध होता. पत्रे का टाकतोस असे म्हणून जळबा धोंडीबा गायकवाड, मारोती जळबा गायकवाड आणि एका महिलेने बालाजी गायकवाड यास मारहाण केली. एवढेच  नाही तर बालाजी गायकवाड याच्या डोक्यात कुर्‍हाडीने मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. १५ जुलैच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. जखमी बालाजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. काळे करत आहेत.

नांदेडमधील सांगवी परिसरात महिलेवर सामुहीक अत्याचार

सांगवी येथील त्रिरत्ननगरात एका घरात जेवन करीत असतांना त्याच घरात आलेल्या चौघांनी महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना ता. १३ जुलै  रोजी रात्री सांगवी परिसरात घडली. या प्रकरणात पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी लक्ष घातल्यानंतर विमानतळ पोलिसांनी अखेर ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
सांगवी बु. येथील रहिवाशी असलेली २६ वर्षीय महिला १३ जुलै रोजी रात्री राहुल गहुबळेसोबत गंगाधर राऊत याच्या घरी आली होती. त्या ठिकाणी      स्वयंपाक करुन राहुलसोबत जेवन करीत असतांना रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या चौघांनी आळीपाळीने सामुहिक अत्याचार     केला. अत्याचारा दरम्यान मोबाईलद्वारे चित्रीकरणही केले. यावेळी कोणाला सांगितल्यास केलेले चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन कपील खाडे, अनिल मुळे, संदीप जोंधळे त्यांच्यासोबतचा मुलगा, राहुल गहूबळे, गंगाधर राऊत,             प्रविण पाटील, रवि हाडसे यांच्याविरुध्द विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उफविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के आणि पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी भेट दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com