सचखंड गुरुद्वारा येथे श्री चंडी साहेब पाठ सुरू

प्रल्हाद कांबळे
Sunday, 18 October 2020

शिख धर्मात दसरा सण हा शक्तीचा, वीररस जागृत करणारा पारंपारिक सण म्हणून साजरा करण्यात येतो. नांदेडमध्ये श्री गुरुगोविंदसिंगजी महाराज यांचे पवित्र वास्तव्य असल्यामुळे येथे दसरा सण ‘दशहरा महात्मा’ म्हणून सतत दहा दिवस साजरा करण्यात येते.

नांदेड : शिख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहराची जगभरात ओळख आहे. शिखांचे देहधारी दहावे गुरु श्री. गुरुगोविंदसिंग यांची समाधी आहे. तख्त सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील हजारो भाविक नांदेडला येत असतात. शिख धर्मात दसरा सण हा शक्तीचा, वीररस जागृत करणारा पारंपारिक सण म्हणून साजरा करण्यात येतो. नांदेडमध्ये श्री गुरुगोविंदसिंगजी महाराज यांचे पवित्र वास्तव्य असल्यामुळे येथे दसरा सण ‘दशहरा महात्मा’ म्हणून सतत दहा दिवस साजरा करण्यात येते.

देश- विदेशातील भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. शिख धर्मात दसरा हा सर्वात मोठा धार्मिक सण असणारा सण पारंपारिकपने शनिवार (ता. १७) ऑक्टोबरपासून तख्त सचखंड श्री हुजुर साहेब येथे विधिवतपणे सुरु झाला. नवरात्रीच्या प्रारंभी दशहरा महात्मा श्री चंडी साहेब पाठ वाचनास प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या दिवशी दशहरा महात्मा पोथी अर्थातच चंडी साहेब पाठाचे धार्मिक प्रथेनुसार समारोप करण्यात येतो. शिख धर्मात दसरा सण श्रद्धावानाने साजरा होतो.

हेही वाचाVideo - माहूरगडावर श्री रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना

शिखांचे धार्मिक स्थान सचखंड गुरुद्वारा 

विशेष म्हणजे नांदेड येथील धार्मिक स्थळ सचखंड श्री हुजुर साहेब येथे दशहरा हल्ला मोहल्ला सन वर्षानुवर्षे प्रथेनुसार साजरा होतो. नऊ दिवस सतत श्री दशम ग्रंथसाहेब अंतर्गत चंडी दि वार म्हणजेच शक्तीच्या विविध अवताराच्या स्थितीचे वर्णन आणि दसरा सणाचे ऐतिहासिक महत्त्व पाठद्वारे प्रसारित करण्यात येते. 

या ठिकाणी सुरु आहे श्रीचंडीपाठ

त्यानुसार शनिवारी (ता. १७) महोत्सवाची सुरुवात झाली. दुपारी सचखंड हजूर साहेब सोबत गुरुद्वारा शिख छावणी, गुरुद्वारा माता साहिब देवाजी, गुरुद्वारा शहीद पुरा, बुंगा बंजारगाह, अबचलनगर आदी स्थानावर श्री चंडी साहेब पाठ सुरू करण्यात आले. अनेक शीख कुटुंबीयांच्या घरीसुद्धा श्रद्धा भावाने पाठ आयोजित करण्यात येतो. दरवर्षी नांदेडमध्ये दसरा सण साजरा करण्यासाठी बाहेरून जवळपास दोन लाख भाविक दाखल होतात. पण या वर्षी कोरोनाचे संक्रमण असल्याने बाहेरून भाविकांचे आगमन कमी प्रमाणात झाल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Chandi Saheb lesson begins at Sachkhand Gurdwara nanded news