श्री गुरु गोबिंदसिंघजी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा स्थगित; स्थानिक पातळीवर "सिक्स ओ साइड" चे आयोजन 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 17 January 2021

कोविड आणि बर्डफ्लू परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आली असल्याची माहिती दुष्ट दमन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ नवाब ( डिम्पल) यांनी दिली. 

नांदेड : नांदेडमध्ये दरवर्षी श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित होणारी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अॅंड सिल्वर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धा यंदा कोविड आणि बर्डफ्लू परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आली असल्याची माहिती दुष्ट दमन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ नवाब ( डिम्पल) यांनी दिली. 

यावेळी संघटनेचे पदाधिकारी महिन्दरसिंघ लांगरी, हरविंदरसिंघ कपूर, संदीपसिंघ अखबारवाले, जीतेन्द्रसिंघ खैरा, जसपालसिंघ काल्हो, महिंदरसिंघ गाडीवाले, हरप्रीतसिंघ लांगरी, विजयकुमार नंदे, अमरदीपसिंघ महाजन, जसबीरसिंघ चीमा आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा नांदेड येथे आज होणाऱ्या पतंग महोत्सवासाठी स्पर्धक तयार

देशात उद्भवलेल्या कोविड परिस्थितीमुळे क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांनी या वर्षीच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे. तसेच कोरोना संक्रमण परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी नांदेड यांनीही असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे यावर्षी होणारी ४८ वीं राष्ट्रीय स्पर्धा स्थगित करण्याचे निर्णय घेण्यात आले. संयोजन समितीतर्फे परंपरा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने या वर्षी फक्त स्थानिक खेळाडूंसाठी "सिक्स ओ  साइड" हॉकी स्पर्धा खेलविण्यात येणार आहे. यासाठी सोशल डिस्टन्स आणि सैनिटाइजर इतियादी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Guru Gobind Singhji National Hockey Tournament postponed nanded news