mahurgad shri renukadevi sansthan
sakal
माहूर (जिल्हा नांदेड) - महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके,शेतजमिनी पाण्याखाली आले असून काहींचा संसार हा उघड्यावर पडला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अनेकांनी आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. यावेळी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यातील संस्थाने पुढे आली आहेत.