दातृत्वाची जाण असणाऱ्यांकडूनच सामाजिक भान जपले जाते

फुलवळ (जिल्हा नांदेड) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकालाच जीव मुठीत घेऊन आलेला दररोजचा दिवस लोटावा लागत असून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता ही जे इतरांसाठी जनजागृती व आरोग्य सेवा देत आहेत. त्यांना सुध्दा शासनस्तरावरुन आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा वेळेत होत नसल्याचे लक्षात आले.
फुलवळ ता. कंधार
फुलवळ ता. कंधार

फुलवळ (जिल्हा नांदेड) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकालाच जीव मुठीत घेऊन आलेला दररोजचा दिवस लोटावा लागत असून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता ही जे इतरांसाठी जनजागृती व आरोग्य सेवा देत आहेत. त्यांना सुध्दा शासनस्तरावरुन आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा वेळेत होत नसल्याचे लक्षात आले. यामुळे फुलवळचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य बालाजी भुजंगा देवकांबळे यांनी मंगळवारी (ता. २०) एप्रिल रोजी स्वखर्चातून येथील आरोग्य उपकेंद्रावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व स्थानिक पत्रकारांना कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉशचे वाटप करण्यात आले.

फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्रावर दररोज गावातील व परिसरातील येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. फरणाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली समूह आरोग्य अधिकारी डॉ. मुश्ताख अहेमद शेख, आरोग्य सहाय्यक एस.एम.अली, आरोग्य कर्मचारी सुधाकर मोरे , आरोग्य सेविका जयश्री गुंडे, लतिका मुसळे, आशावर्कर शेवंता गोधणे, मीना वाघमारे, अर्धवेळ कर्मचारी रुखीयाबी शेख हे सर्वजण सेवा देत आहेत. तर दैनंदिन घटना घडामोडीचे अपडेट देण्यासाठी स्थानिक पत्रकार तत्पर आहेत.

हेही वाचा - पोतरा येथे चैत्रशुध्द एकादशीपासून हनुमान जयंती पर्यंत पवित्रेश्वर महादेवाची यात्रा असते. आमल्या बारशीची ही यात्रा सर्वदूर परिचित आहे

तेंव्हा आपल्या सर्व गावकरी व नागरिकांची पुरेपूर काळजी घेत आहेत तेंव्हा त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही याचा पुरेपूर विचार करत आपणही समाजाचे काही देणे लागतो याचा विचार करुन सामाजिक बांधिलकी जपत माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी केलेल्या दातृत्वाची सर्वत्र सकारात्मक चर्चा होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

यावेळी बालाजी देवकांबळेसह उपसरपंच तुळशीदास रासवंते, ग्राम पंचायत सदस्य चंदबस आप्पा मंगनाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी रहीम शेख , ग्रा. पं. संगणक ऑपरेटर हिरकांत मंगनाळे, पत्रकार धोंडीबा बोरगावे, विश्वांभर बसवंते, मधुकर डांगे, शादुल शेख, समूह आरोग्य अधिकारी डॉ. मुश्ताख अहेमद शेख, आरोग्य सहाय्यक एस. एम. अली, आरोग्य कर्मचारी सुधाकर मोरे, आरोग्य सेविका जयश्री गुंडे, लतिका मुसळे, आशावर्कर शेवंता गोधणे, मीना वाघमारे, अर्धवेळ कर्मचारी रुखीयाबी शेख या सर्वांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com