कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांना पहिला डॉ. प्रज्ञा स्मृती सन्मान

शिवचरण वावळे
Friday, 31 July 2020

डॉ. प्रज्ञा जोशी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी (ता.३१) गॅलेक्सी हॉस्पिटलच्या वतीने कोल्हापूरच्या कु. सोनाली नवांगुळ यांना पहिला डॉ. प्रज्ञा स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

नांदेड : येथील गॅलेक्सीचे संचालक पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर नितीन जोशी यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा जोशी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी (ता.३१) गॅलेक्सी हॉस्पिटलच्या वतीने कोल्हापूरच्या कु. सोनाली नवांगुळ यांना पहिला डॉ. प्रज्ञा स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

गॅलेक्सी हॉस्पिटल येथील डॉ. प्रज्ञा नितीन जोशी स्मृतीहॉल येथे ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ ह्या मोबाईलच्या माध्यमातून जोडल्या गेल्या होत्या. त्यांना डॉक्टर नितीन जोशी यांनी ऑनलाइन पद्धतीने रोख रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून पोस्टाद्वारे त्यांना सन्मानपत्र पाठविण्यात आले असल्याचे डॉ. जोशी यांनी माहिती दिली. याप्रसंगी कवी - लेखक मनोज बोरगावकर व मुखपृष्ठकार नयन बाराते यांची उपस्थिती होती.

गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुढाकार

यावेळी बोलताना डॉक्टर जोशी म्हणाले की डॉक्टर प्रज्ञा या प्रशिक्षणात उच्च विभूषित असताना देखील त्यांनी नको त्या वयामध्ये जीवन यात्रा संपवली तर दुसरीकडे नऊ वर्षे वय असताना अंगावर बैलगाडी पडल्याने कमरेपासून दिव्यांग असलेल्या कुमारी सोनाली नवांगुळ ह्या तितक्यात जिद्दीने व उत्साहाने जीवन जगत असून त्यांचा जीवनप्रवास हा सोपा नसला तरी, तो इतरांना प्रेरणादायी असा आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास पाहता त्यांची या पुरस्कारासाठी योग्य निवड करण्यात आली असून, यासाठी नयन बाराते व मनोज बोरगावकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. यापुढे देखील डॉ. प्रज्ञा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी सोनाली नवांगुळ यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार असून, नीटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे असे डॉ. जोशी म्हणाले. यावेळी मनोज बोरगावकर व नयन बारहाते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा -  कंधारमध्ये का केली महिलेनी आत्महत्या? वाचा सविस्तर...

समाजातील बोलणे ऐकून कधीही वाईट वाटून घेतले नाही

"जगण्याची लढाई कितीही कठीण असली तरी, आपण मिळवलेले ज्ञान आणि त्यामागे घरच्यांचे असलेले पाठबळ ह्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजासाठी जगता आले पाहिजे. जीवनात अनंत अडचणी येत असतात त्या अडचणींवर सहज मात करता यावी सोनाली नवांगुळ यांनीदेखील असाह्य वेदना व समाजातील बोलणे ऐकून कधीही वाईट वाटून घेतले नाही.उलट्या अपंगत्व म्हणजे एक नवीन संधी असल्याचे मानून आज समाजाला प्रेरणा देत आहेत. सोनाली प्रमाणेच इतरांना देखील आपल्या कमीपणा भ्रमात करून समाजाला प्रेरणादायी असे काहीतरी देता आले पाहिजे."

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonali Nawangul of Kolhapur was the first Dr. Pragya Smriti Sanman nanded news