file photo
file photo

सोयाबीन कंपन्यांच्या अडचणीत वाढ, पुन्हा दोन गुन्हे दाखल

नांदेड : बनावट बियाणे प्रकरणी मुदखेड आणि नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट सोयाबीन बियाने शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची आर्थीक नुकसान करणाऱ्या या कंपन्यांची अडचण वाढली असून जिल्हाभरात अजून काही काही ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मध्यप्रदेश मधील वेगवेगळ्या दोन कंपन्यांमधून सोयाबीनचे आलेले बियाणे परभणी येथील प्ररिक्षण प्रयोगशाळेने सिद्ध बनावट व दर्जाहीन आणि उगवन क्षमता नसल्‍याचे सांगितले. शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला असून कर्ज काढून तो आपल्या शेतामध्ये महागा मोलाची बियाणे टाकतो. परंतु काही सोयाबीन कंपन्यांनी यावर्षी लॉकडाऊनचा फायदा उचलत बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्याचा परिणाम असा झाला की पेरलेली बियाणे हे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली.

परभणी कृषी विद्यापीठात या बियाणांची तपासणी 

मुदखेड तालुक्यातील जवळपास बारा गावांमध्ये मध्यप्रदेशमधील इंदोर येथून सीड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे सोयाबीन बियाणे आले होते. परंतु हे बियाणे दर्जाहीन असून शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर उगवले नाही. सदर कंपनीचे बियाणे उगवण न झाल्याने व कंपनीचे वेगवेगळे कृषी दुकानातून बियाण्याचे नमुने घेऊन बीज परीक्षण प्रयोगशाळा परभणी येथे हे तपासणीसाठी पाठविले. परभणी कृषी विद्यापीठात या बियांची तपासणी केली असता ते अप्रामाणिक असल्याचे निष्पन्न झाले. सदर कंपनीच्या बियाणे वापर करणाऱ्या शेतकऱ्यावर फार मोठे आर्थीक संकट कोसळले. शेतकऱ्यांना विक्री केलेले सोयाबीनचे बियाणे प्रमाणिक निकृष्ट दर्जाचे असताना हे माहीत असून सुद्धा कंपनीचे बियाणे उत्पादन विपणन करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली. 

मुदेखड पोलिस ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी मुदखेड तालुका कृषी अधिकारी सुनील निरंजन पुरी यांच्या फिर्यादीवरून कंपनीचे आर्णी (ता. नेर) जिल्हा यवतमाळ येथील मार्केटिंग मॅनेजर दुलसींग मंडलोई आणि कंपनीविरुद्ध फसवणूक व भारतीय दंड विधान कलम बियाणे कायदा १९६६ कलम ६ (ब) ७ (ब) बियाणे अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले करीत आहेत.

वरदान बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर गुन्हा

तर दुसऱ्या घटनेत नायगाव तालुक्यातील पांडुरंग कृषी सेवा केंद्र शिवाजी चौक येथून अनेक शेतकऱ्यांनी वरदान बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उज्जैन मध्यप्रदेश येथील कंपनीचे बियाणे खरेदी केले. परंतु तेही बियाणे उगवले नाही. कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला हे सिद्ध झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. कंपनीला माहित असताना सुद्धा त्यांनी बनावट बियाणे आपल्या वितरकामार्फत शेतकऱ्यांच्या माथी मारले. 

नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा 

शेतकऱ्यांची मोठी कोंडी केली. तसेच त्यांची फसवणूक केली या प्रकरणी तालुका कृषी कार्यालय नायगावचे गुणनियंत्रण निरीक्षक राजेंद्र नरसिंग काळे यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात कंपनीचे क्षत्रिय विपणन व्यवस्थापक भिमराव शिवाजी नागरगोजे आणि वरदान बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उज्जैन या सोयाबीन उत्पादन कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटेकर करत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com