esakal | नागरीकांचे आरोग्याकडे विशेष लक्ष; कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट रविवारी २०५ रुग्ण कोरोनामुक्त ः १२० जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोना आजार वाढल्यापासून अनेकजण स्वःताच्या आणि परिवाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. जेवणात दूध, अंडी, मास, मटण, मोड आलेली कडधान्य अशा विटॅमीन आणि प्रोटीनयुक्त अन्न सेवनाकडे जास्त कल वाढला आहे. त्याचाच परिणाम मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाढलेली बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिसून येत आहे. 

नागरीकांचे आरोग्याकडे विशेष लक्ष; कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट रविवारी २०५ रुग्ण कोरोनामुक्त ः १२० जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील तीन महिण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. परंतु गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूमध्ये चांगलीच घट झाली आहे. रविवारी (ता.११) प्रयोगशाळेकडून ८७७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७१० निगेटिव्ह, १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७ हजार ४२० एवढी झाली आहे.
 
रविवारी दिवसभरात तरोडा नाका महिला (वय ५३), धानोरा ता. कंधार पुरुष (वय ७१), आजमपूर तालुका बिलोली पुरुष (वय ५५) आणि मुदखेड पुरुष (वय ७१) या चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ४५६ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- जिल्ह्यात ३८५ कोरोना पॉझिटिव्ह पुरुषांचा मृत्यू, सर्वाधिक पुरूषांचा हायरिस्कमध्ये समावेश

या गात आढळले पॉझिटिव्ह

शनिवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी ८७७ अहवाल प्राप्त झाले. यात १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये नांदेड वाघाळा महापालिका हद्दीतील- ४४, नांदेड ग्रामीण- १०, अर्धापूर-दोन, किनवट-१०, नायगाव-पाच, कंधार-तीन, लोहा- दोन, माहूर- चार, भोकर- तीन, मुखेड- तीन, हदगाव- एक, देगलूर- चार, उमरी- एक, मुदखेड- सहा, बिलोली-१२, हिंगोली- सहा, परभणी- दोन आणि यवतमाळ- दोन असे १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून

७०६ स्वॅबची चाचणी सुरू

दहा दिवसाच्या उपचारानंतर रविवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालय-१३ , गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- १०, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईन मधील १४५, धर्माबाद- दोन, मुखेड- नऊ, बिलोली- एक, मुदखेड- चार, देगलूर - दोन आणि खासगी रुग्णालयातील १९ असे २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १४ हजार ३९१ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या दोन हजार ४६१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील ४८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ७०६ स्वॅबची चाचणी सुरू होती. 

कोरोना मीटर ः 

रविवारी पॉझिटिव्ह- १२० 
रविवारी कोरोनामुक्त- २०५ 
रविवारी मृत्यू- चार 
एकूण पॉझिटिव्ह- १७ हजार ४२० 
एकूण कोरोनामुक्त- १४ हजार ३९७ 
एकूण मृत्यू- ४५६ 
उपचार सुरू- दोन हजार ४६१ 
गंभीर रुग्ण- ४८ 
अहवाल प्रतिक्षेत- ७०६ 
 

loading image
go to top