सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून 

गंगाराम गड्डमवार
Sunday, 11 October 2020

यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक हे शनिवार (ता. १०) सुटीचा दिवस असल्याने सहस्त्रकुंड धबधबा पाहाण्यासाठी सहकुंटूब सहपरिवारासह विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली (ता. उमरखेड) येथे आले होते.

इस्लापूर (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवरील मुरली गावच्या बंधाऱ्याचे अचानक पाणी सोडण्यात आल्याने एक महिला वाहून गेली असून, दोन मुलींना मात्र एका तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन त्यांचा जीव वाचवला आहे. ही घटना शनिवारी (ता. दहा) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली गावाजवळील सहस्त्रकुंड येथे घडली आहे. 

यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक हे शनिवार (ता. १०) सुटीचा दिवस असल्याने सहस्त्रकुंड धबधबा पाहाण्यासाठी सहकुंटूब सहपरिवारासह विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली (ता. उमरखेड) येथे आले होते. सर्व कुंटूब नदीकाठी उभे राहून आंनद घेत असताना या पैनगंगा नदीवर मुरली गावाच्या वरच्या बाजुने उच्च बंधाऱ्यातील अचानक पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यात ममता संतोष कुमार व तीच्या दोन मुली वाहून जात असताना आरडाओरड केल्याने मुरली येथील संदीप राठोड या तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेउन त्यांच्या दोन मुलींना वाचवण्यात यश मिळविले. पण मुलींच्या आईचा शोध लागला नाही. ममता कुमारी यांचा अद्याप शोध लागला नसल्याचे सांगुन शोध मोहीम सुरू असल्याची माहिती सहस्त्रकुंड ट्रस्टचे सचिव सतिश वाळकीकर यांनी दिली. 

हेही वाचा श्री रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांनी घरीच साजरा करावा- विश्वस्त

कवानकर कुटुंबातील एका मुलीचा मृत्तदेह सापडला

हदगाव येथील कवानकर कुटंबातील एका मुलीचा मृत्तदेह शनिवारी (ता. १०) रात्री कुजलेल्या अवस्थेत सापडला. मात्र हा मृतदेह कवानकर यांच्या मुलीचाच आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान या सामुहीक आत्महत्या प्रकरणाची तक्रार मयत महिलेच्या भावाने इस्लापूर पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र त्या तक्रारीचे नेमके काय झाले हे मात्र अद्याप समजले नाही. घरगुती वादातून कवानकर कुटुंबियानी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यातील अजून एक लहान मुलगी बेपत्ता असून तिचा शोध सुरु आहे. पैनगंगा नदीला पूर असल्याने शोध कार्यात अडथळा येत आहे. 

येथे क्लिक करा - नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

सहस्रकुंड धबधबा बनला मृत्यूचा हॉटस्पॉट

लॉकडाऊनच्या काळातही अनेक पर्यटक आपल्या परिवारासह धबधबा पाहण्यासाठी येत असतात. हा धबधबा मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर पैनगंगा नदीवर सहस्रकुंड येथे आहे. पर्यटक मोठ्या संख्येने विदर्भ व मराठवाडा तसेच तेलंगनातून येतात. मात्र मागील काही वर्षापासून या ठिकाणी सेल्‍फी किंवा पोहण्याचा मोह सुटणाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमुन पर्यटकांना योग्य सुचना दिल्या तर हे अनर्थ टळतील असे बोलले तर वावगे ठरणार नाही. एकंदरीत हा धबधबा परिसर मृत्यूचा हॉटस्पॉट झाला की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahasrakund waterfall hotspot of death: Yavatmal tourist woman carried away nanded news