esakal | विशेष स्टोरी : बेसुमार वृक्षतोडीमुळे मधमाशांचा अधिवास धोक्यात; शेतीचे होत आहे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

मधमाशा

विशेष स्टोरी : बेसुमार वृक्षतोडीमुळे मधमाशांचा अधिवास धोक्यात; शेतीचे होत आहे नुकसान

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः आयुर्वेदीक औषध शास्त्रात मधाला फार महत्त्व आहे. परंतु, औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दूर्मिळ होत आहे. बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाशांचा आश्रय हिरावला जात आहे. त्यामुळे माशांना माधासाठी पोळे घालता येत नसल्याने साहजिकच मधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे.

मानवनिर्मित प्रदूषण व वृक्षतोड यामुळे मधमाशांची संख्या घटल्यामुळे, तसेच मधमाशीपालन करुन मध निर्मिती उद्योगाला चालना मिळत नसल्याने, नैसर्गिक मध मिळणे कठीण झाले आहे. सर्दी खोकला सारख्या आजारावर प्राथमिक उपचार म्हणून मधाचा वापर केला जातो. सर्वसामान्य जनतेला मिळणारे मध झाडांच्या गर्दीतून गोळा केले जाते. नैसर्गिक मध सर्वसामान्यांपासून, तर श्रीमंत लोक आवडीने खरेदी करतात. पण हे चविष्ट व बहुपोयोगी मध मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकाऱ्याची नितांत गरज - अशोक चव्हाण

वाढत्या लोकसंखेमुळे जंगले भुईसपाट होत आहेत. परिणामी दाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या मधमाश्याची संख्या कमी झाली असून, याचा परिणाम या क्षेत्रातील रोजगार निर्मिती वर होत आहे, तसेच शेतामध्ये फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे देखील मधमाशांची संख्या घटत आहे. जळाऊ लाकडासाठी जंगलातील झाडांची मोठी कत्तल केली जाते, तसेच निसर्गाचा लहरीपणा व मानवनिर्मित अडथळे यामुळे मध माशांच्या जातीही नष्ट होत आहेत.

शेतीचे मोठे नुकसान ः

शेतात असलेल्या मधमाशाच्या वसाहतीत लाखो मधमाशा असतात. या मधमाशा परागकण गोळा करतात. यापासून पोळामधे मध तयार होते. हे पराग गोळा करताना मधमाश्या फुलावर बसतात, मधमाशाच्या पायावर लव असते. या लवेला परागकण चिटकतात यामुळे नैसर्गिक परागीभवन होते. पर्यायाने पिकांमधे मोठी वाढ होते. मात्र, मधमाशा नसल्याने पिकाच्या उत्पन्नात घट होत आहे.

कीटकनाशकांनीच घेतला बळी ः

शेतकरी पिकावर कीटकनाशकांची फवारणी करतात. काही कीटकनाशके धुरीजन्य, तर काही स्पर्शजन्य असतात. आता नवीन कीटकनाशकामध्ये पोटात गेल्यावर कीड किंवा अळीचे आतडे कुजून कीटकाचा मृत्यू होतो. फवारणी केल्यानंतर ही कीटकनाशके मधमाश्यांच्या पोटात जातात, त्यामुळे मधमाशाचे प्रमाण कमी होत आहे. तेव्हा मधमाशांना वाचवायचे असेलतर सर्वप्रथम जंगले वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image