esakal | हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी नांदेडहून विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

train

हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी नांदेडहून विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: कोरोनामुळे नांदेड-अम्ब अन्दौरा (हिमाचल प्रदेश) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता ही रेल्वे तीन ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पूर्वी या रेल्वेचा क्रमांक २२४५७/२२४५८ असा होता. तीन ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या साप्ताहिक रेल्वेचा क्रमांक बदलण्यात आला आहे. ०५४२७ नांदेड-अम्ब अन्दौरा विशेष एक्स्प्रेस येथील स्थानकावरून सकाळी ११.५ ला सुटेल. पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खंडवा, भोपाळ, मथुरा, नवी दिल्ली, अंबाला केंट, साहिबजादा अजित सिंघनगर, नांगलडेम, उना हिमाचल मार्गे अम्ब अन्दौरा येथे बुधवारी (ता.चार) सायंकाळी पोचेल.

हेही वाचा: वाढत्या गुन्हेगारीवर हवा अंकुश; तरूणाई अडकली अवैध धंद्यात

०५४२८ अम्ब अन्दौरा- हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस पाच ऑगस्टपासून दर गुरुवारी दुपारी १५.१० ला सुटेल आणि शुक्रवारी रात्री २१.४० ला येथे पोचेल. ही रेल्वे १६ डब्यांची असून पूर्णपणे आरक्षित असेल. प्रवाशांना कोरोना नियामवलीचे पालन करावे लागेल.

loading image
go to top