esakal | वाढत्या गुन्हेगारीवर हवा अंकुश; तरूणाई अडकली अवैध धंद्यात
sakal

बोलून बातमी शोधा

nanded crime

वाढत्या गुन्हेगारीवर हवा अंकुश; तरूणाई अडकली अवैध धंद्यात

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: शहरामध्ये दोन टोळीच्या भांडणात एकाला गोळ्या घालून आणि तलवारीने वार करून ठार करण्यात आले. या प्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी हे १८ ते २४ वर्षाच्या आतील आहेत. त्यामुळे त्यांच्यात एवढी हिंमत कशी आणि कुणामुळे आली? त्याचबरोबर त्यांच्याकडे बंदुका कशा आल्या? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्या घटनांमुळे आता वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश असण्याची गरज निर्माण झाली असून पोलिसांसह समाजानेही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (crime happening in nanded increases)

नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीसह इतर वाहनांची चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी यासह हाणामारी आणि चाकू, खंजरने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर गावठी कट्टे आणि बंदुकीचाही वापर होत असून त्याद्वारे गोळीबार करून ठार मारण्यापर्यंत आरोपींची मजल गेली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी तरूण असून काही जणांना अजून मिशाही फुटल्या नाहीत तर काही जण विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे तपासात निष्पण झाले आहे.

हेही वाचा: TET Exam: शिक्षक पात्रता परीक्षा होणार दहा ऑक्टोबरला

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या परीने वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली असली तरी त्यासोबतच आता समाजाने देखील दक्ष राहण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्ष ठेऊन त्याबाबत पोलिस प्रशासनाला सतर्क करणे महत्वाचे आहे.

पोलिस चौकी कार्यान्वित हवी
पोलिस ठाण्यातंर्गत पोलिस चौकी उभारण्यात आल्या. मात्र, तेथे पोलिस कर्मचारी कधीच नसतात. मध्यंतरीच्या काळात पोलिस चौकीत पोलिस अधिकारी, कर्मचारी राहत असल्यामुळे गुन्हेगारांवर वचक होता. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस चौकीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

हेही वाचा: Heavy Rain: 'नुकसानीची माहिती ७२ तासांत ॲपवर द्या'

पोलिसांच्या गस्तीत सातत्य हवे
पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असते. मात्र, अनेक ठिकाणी ही गस्त बंद असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी ही केवळ हॉटेल, बारच्या समोरील वर्दळ कमी करण्याच्या कामात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. तसेच प्रत्येक ठाण्यात एक गुन्हे शोध पथक (डीबी) असते. त्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचेही बारकाईने घटनांकडे लक्ष हवे.

कडक धोरणाची गरज
पोलिस आणि गुन्हेगारांचे काही ठिकाणी सलोख्याचे संबंध असल्याने त्याचाही गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर वचक असला पाहिजे आणि पोलिस ठाण्यातंर्गत कडक अंमलबजावणीची गरज आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारीवरही तत्काळ कारवाई हवी जेणेकरून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक निर्माण होईल आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल.

loading image
go to top