esakal | स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. १० जानेवारी २०२१रोजी बॉयोइनफॉर्मेटीक्स, बॉटनी, केमिस्ट्री, कॉमर्स,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर सायन्स,डेअरी सायन्स, इसी/ ईसिटी इंजिनिअरिंग,जिओग्राफी, जिओफिजिक्स, लॉ, मॅनेजमेंट, मायक्रोबॉयोलॉजी,फिलोसॉफी, फिजिक्स, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, स्टॅटिस्टिक्स व  झूओलॉजी इत्यादी विषयाच्या परीक्षा होणार आहेत.

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएच. डी प्रवेशपूर्व पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये ता. २९ डिसेंबर २०२० रोजी बायोटेक्नॉलॉजी, सिविल इंजिनिअरिंग, इकोनॉमिक्स, एज्युकेशन, इंग्लिश,एन्व्हायर्नमेंट सायन्स,जिओलॉजी, हिंदी,हिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मराठी, मॅथेमॅटिक्स, फार्मसी, फिजिकल एज्युकेशन, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, सोशीओलॉजी, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी व उर्दू इत्यादी विषयाच्या परीक्षा होणार आहेत.  

दुसऱ्या टप्प्यामध्ये ता. १० जानेवारी २०२१ रोजी बॉयोइनफॉर्मेटीक्स, बॉटनी, केमिस्ट्री, कॉमर्स,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर सायन्स,डेअरी सायन्स, इसी/ ईसिटी इंजिनिअरिंग, जिओग्राफी, जिओफिजिक्स, लॉ, मॅनेजमेंट, मायक्रोबॉयोलॉजी, फिलोसॉफी, फिजिक्स, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, स्टॅटिस्टिक्स व  झूओलॉजी इत्यादी विषयाच्या परीक्षा होणार आहेत. वरील दोन्हीटप्प्यातील पेट -२०२० परीक्षा ही विद्यापीठाने निर्धारित केलेल्या नांदेड, लातूर व परभणी शहरातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविलेले आहे.

हेही वाचानांदेड : राष्ट्रीय महामार्गच्या कामात वीज वितरणचा आडवा दांडू. -

जिल्हाधिकारी कार्यालयात “सुशासन दिन” संपन्न  

नांदेड : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस 25 डिसेंबर हा “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात “माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व सेवा हमी कायदा” याविषयावर प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारद्वारे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांनी केले. तर उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी निळकंठ पांचगे, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता भिमराव हाटकर यांनी ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिली गेली. शेवटी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी आभार मानले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये क्षमतावृद्धी करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 26 (1) अन्वये माहितीचा अधिकार या विषयावर पदनिर्देशित केलेले सहाय्यक जन माहिती अधिकारी, राज्य जन माहिती अधिकारी, अपिलीय प्राधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे संनियंत्रण जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले होते.
 

loading image