esakal | स्वारातीम विद्यापीठाच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ता. २४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या ता.३० सप्टेंबर रोजीच्या तातडीच्या बैठकीतील ठरावानुसार ता. सहा आॅक्टोबर रोजी पासून सुरू होणाऱ्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी काढले आहे. 

स्वारातीम विद्यापीठाच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी- २०२० च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवार (ता. सहा) ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित झाले होते. पण विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ता. २४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या ता.३० सप्टेंबर रोजीच्या तातडीच्या बैठकीतील ठरावानुसार ता. सहा आॅक्टोबर रोजी पासून सुरू होणाऱ्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी काढले आहे. 

या सर्व परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. उन्हाळी-२०२० च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखेतील बद्दलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी सदर बाब आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावी, असेही परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

हेही वाचा - जिल्ह्यात दहा केंद्रावर एम.एच.टी.-सीईटी-2020 प्रवेश परीक्षा होणार- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

परिक्षेपूर्वीच महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा तान वाढला

नांदेडः कोरोनामुळे विद्यार्थ्यांना फेसबुक व झुम ॲपच्या माध्यमातून आॅनलाईन क्लासेस घेतण्यात येत आहेत. परिक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयाऐवजी घरी बसून आॅनलाईन परिक्षा देण्यासाठी मुभा दिली गेली आहे. परंतु परिक्षेसाठी अनिवार्य असलेले हॉलटिकीट मात्र आॅनलाईन देण्यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यावरील कामाचा तान वाढला आहे. कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याने परिक्षा घ्याव्यात की नाही. अशा द्विधामनस्थितीत असलेल्या राज्य शासनाने अखेर परिक्षा घेण्याचा निर्णय घेता आहे.  

या नियमात बदल झाला आहे

पूर्वी विद्यार्थ्याचे नाव, परिक्षा क्रमांक आणि विषयासह फोटो असलेल्या हॉल तिकीट संबंधित महाविद्यालयाकडे पाठविण्यात येत होते. विद्यापीठाकडून आलेल्या हॉल तिकिटाची झेरॉक्स काढुन त्यावर परिक्षार्थी विद्यार्थ्यांची स्वाक्षरीनंतर शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी असा हा नियम होता. या नियमात बदल झाला आहे. 

येथे क्लिक करा - नांदेड : अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड नगरला तर विजय कबाडे भोकरला

फोटो मिळवणे ते डाऊनलोड करणे अशी कामे

संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांना फोन किंवा इमेल वा व्हॉटस्अपवर मेसेज पाठवून मेलवर फोटो मागवून घ्यावे लागत आहेत. विद्यार्थ्यांकडून मेलवर आलेले फोटो डाउनलोड करुन ते विद्यापीठाकडून आलेल्या हॉलतिकटावर फोटो चिटकवून विद्यार्थ्यांना हॉलतिकीट द्यावे लागणार आहे. सध्या महाविद्यालयात देखील प्राचार्य, उपप्राचार्य आणि एक शिपाई असा अतिशय कमी मनुष्यबळावर सर्व कार्यालयीन कामे करावी लागत आहेत. यातच विद्यार्थ्यांना वेळेवर हॉलतिकिट मिळावे म्हणून त्यांचे फोटो मिळवणे ते डाऊनलोड करणे अशी कामे करावी लागत आहेत.