
नांदेड : कारवाईच्या भीतीने सातशेपेक्षा अधिक कर्मचारी कामावर हजर
नांदेड : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनिकरण व्हावे यासाठी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीचे मागील अनेक दिवसापासून संप सुरु आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वेळा कामगारांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याने राज्य सरकारने देखील ताठर भूमिका घेतली आहे. या भितीने मागील दोन दिवसात नांदेड विभागातील सातेशेपेक्षा अधिक कर्मचारी कामावर रुजु झाले आहेत. (ST workers strike news)
नांदेड एसटी विभागात एकूण दोन हजार ८०६ कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यापैकी एक हजार २८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यात राज्य सरकारला अर्धे यश आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची मनधणी करण्यासाठी सरकारला लवकरच यश येईल असा विश्वास सरकारला वाटत आहे. मागील दोन दिवसात विविध विभागातील ७११ कर्मचारी कारमावर हजर झाल्याने विभागात ११८ एसटी बसेस सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे. अनेकवेळा सांगुन देखील कर्मचारी कामावर हजर न झाल्याने ३१८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
सध्या विभागीय कार्यशाळेतील नऊ कर्मचारी कामावर हजर झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या १०९ इतकी झाली आहे. तर विभागीय कार्यशाळेतील ९० कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचारी रजेवर आहेत. नांदेड आगारात १४९, भोकर १६, किनवट ३४, मुखेड ९३, कंधार १०८, बिलोली ६८, देगलूर ७४, हदगाव ५४ व माहूर १६ असे ७११ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. विभागातील इतर कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर कामावर हजर होऊन प्रशासनास सहकार्य करावे असे एसटी विभागाच्या वतीने आवाहन केले जात आहे.
Web Title: St Workers Strike Employees Present At Work For Fear Of Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..