
हा रस्ता राजमार्ग म्हणून समावेशित व्हावा यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता
माहूर (जि. नांदेड) : माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गापासून आष्टा, पैनगंगा नदीपासून यवतमाळ जिल्ह्यातील राणी धानोरा,अंजनखेड ते लोनबेहेळपर्यंतच्या इतर जिल्हा मार्गाला शासनाने गुरुवारी (ता. २१) रोजी शासन निर्णयानुसार रस्ते विकास आराखड्यामध्ये समावेश करून या पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता दर्जोन्नत होणार आहे. हा रस्ता राजमार्ग म्हणून समावेशित व्हावा यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या मार्गामुळे विदर्भ- मराठवाडा जोडला जाईल शिवाय हा रस्ता वीस किलोमीटर परिसरातील एकमेव पैनगंगा नदी ओलांडून दोन्ही प्रदेशांना जोडणारा रस्ता ठरेल.
माहूरगड हे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मुख्य पीठ आहे. तसेच माहूर तालुका हा आदिवासी अती दुर्गम, डोंगराळ भागात वसलेला आहे.यवतमाळ व नांदेड जिल्ह्या ला जोडण्यासाठी सध्यास्थितीत पैनगंगा नदीवरील धनोडा पुल व तेलंगणा सीमेजवळील पैनगंगा नदीवर उनकेश्वर स्थित पुल हे दोन रस्ते उपलब्ध आहे. जे की ५५ किलोमीटर अंतरावर आहे. धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग १६१ अ पासून जवळ पडसा येथे पैनगंगा नदीवर पुलाचे काम प्रगतीपथावर आहेच मागणी होती. ती हा मार्ग रस्ता विकास आराखड्यामध्ये समावेश करून रस्ता राज्य मार्गात समावेशीत होऊन दर्जोन्नत होण्याची ज्यामुळे परिसरातील पन्नास गावांना यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या बाजारपेठा उपलब्ध होतील व परिसराचा सर्वांगीण विकास साध्य होईल.
हेही वाचा - नांदेडमध्ये संतापजनक घटना : सालगड्याने अत्याचार करुन केला बालिकेचा खून
या रस्त्याच्या दर्जा नदीबाबत आमदार भीमराव केराम यांनी दूरदृष्टीने विचार करून प्रारंभापासूनच इतर जिल्हा मार्गाचे राज्य मार्गात समावेश होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासनाकडे सलग पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित आज राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या अवर सचिव (नियोजन) प्रशांत पाटील यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय निर्गमित करुन राष्ट्रीय महामार्ग १६१ आष्टा (माहूर) पासुन यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३६१ पर्यंत रस्त्याचे दर्जोन्नत राज्यमार्ग क्रमांक ४०४ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या गावांना सुविधा मिळणार?
दर्जोन्नत राज्यमार्ग मुळे माहूर तालुक्यातील लखमापूर, नखेगाव, पापलवाडी, टाकळी, लांजी, उमरा, मुरली, असोली, मेट, वाई बाजार, गोकुळ, पडसा, वडसा, सायफळ व पार्डी तर यवतमाळ जिल्ह्यातील सावळी, कवठा, शारी, मालेगाव, ईचोरा,
संपादन- प्रल्हाद कांबळे