esakal | आता लाल परीने बिनधास्त प्रवास करा
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

या संकटातून सावरण्यासाठी व प्रवाशांना पुन्हा एसटीच्या प्रवासाकडे वळविण्यासाठी एसटी महामंडळ प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येते

आता लाल परीने बिनधास्त प्रवास करा

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड: कोरोनाची तिसरी लाट आक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून प्रवाशांच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही, याची आत्तापासूनच एसटी महामंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांच्या दृष्टीने महामंडळाने एसटी बसला आतून बाहेरुन अँटी मायक्रो बॅक्टेरियल कोटींग करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना संसर्गापासून अनेकाना प्रवाशांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते. कोरोनाची लोकांच्या मनातील भीती अजून गेलेली नाही. याचा एसटी महामंडळास सर्वाधिक फटका बसला आहे. या संकटातून सावरण्यासाठी व प्रवाशांना पुन्हा एसटीच्या प्रवासाकडे वळविण्यासाठी एसटी महामंडळ प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येते. प्रवासा दरम्यान नागरिकांना कोरोनाच्या विषाणूपासून मुक्तता मिळावी यासाठी नांदेड एसटी विभागाने बसेसचे अँटी मायक्रो बॅक्टेरियल कोटींग करुन प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी आता एसटीने बिनधास्त प्रवास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. शहरातील जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशी बसपैकी ८६ बसचे अँटी मायक्रो बँक्टेरिअल कोटींग करण्यात आली आहे. यासाठी एका बसवर महामंडळास साधारणता एक हजार रुपयापर्यंतचा खर्च येत आहे. या बसला दोन महिन्यातून एकदा अशा प्रकारची कोटिंग केली जाणार आहे.

हेही वाचा: 'शिवसेनेसारख्या विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही'

कोरोना दरम्यान लॉकडाउनमुळे प्रवासी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोट्यावधीचा फटका सहन करावा लागत होता. कोरोना महामारी दरम्यान विभागातील अनेक बसचालक, वाहक यांच्यासह मेकॅनिक विभागातील अनेक कर्मचारी यांच्या १५ ते २० दिवसापर्यंत मुंबईतील विविध स्थानकावर सेवा बजावण्याचे आदेश काढण्यात आले होते. तरी देखील त्यांचा वेळेवर पगार करण्याइतपत एसटी महामंडळाकडे पैसे उपलब्ध होत नव्हता. राज्य सरकारकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा - सवलतीचा राज्य सरकार कडे महामंडळाचे कोट्यावधी रुपये धकले होते. अशा कठिण काळात देखील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगाराची फारशी चिंता न करता सेवा दिली. मागील काही दिवसापासून बससेवा प्रवाशांच्या सेवेत पुन्हा रुजु झाली आहे. तरी देखील प्रवाशांकडुन पूर्वी प्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आजही महामंडळाची बससेवा तोट्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे.

सध्या शहरातील ८६ बसचे अँटी मायक्रो बँक्टेरिअल कोटींग करण्यात आली आहे. भविष्यात सर्व बसेसची अशा प्रकारची कोटींग केली जाणार असून प्रवाशांनी विश्‍वासाने एसटीचा प्रवास करावा व तोट्यातून जात असलेल्या एसटी महामंडळास पुन्हा एकदा पूर्वी सारखी उभारी द्यावी अशी अपेक्षा आहे.

-पुरुषोत्तम व्यवहारे, आगारप्रमुख, नांदेड.

loading image
go to top